कळमनुरी,वसमतमध्ये पक्षाच्या नेत्यांची एकही सभा न घेता आमदार बांगर:आमदार नवघरेंनींनी घडविला विजयाचा इतिहास, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा निष्प्रभ

2 hours ago 1
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कळमनुरी विधानसभा मतदार संघात शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वरिष्ठ नेत्यांची एकही सभा न घेता कार्यकर्त्यांच्या सोबतीने विजयाचा इतिहास रचला. दुसरीकडे मात्र खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा झाल्यानंतरही त्यांची नेते मंडळी विधानसभेत निष्प्रभ ठरली आहेत. तर दुसरीकडे वसमत विधानसभेतही राष्ट्रवादीचे राजेश नवघरे यांनी मतदारांच्या गाठीभेटीवरच भर देत विजय मिळविला. राज्यात शिवसेनेच्या फुटीनंतर सर्वात जास्त चर्चा कळमनुुरीचे आमदार संतोष बांगर यांची झाली होती. सुरवातीला ठाकरे गटात राहण्याचे आश्‍वासन दिलेल्या बांगर यांनी दोनच दिवसांत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या भुमीकेवर चांगलीच टिका होऊ लागली होती. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कळमनुरीत सभा घेऊन बांगर यांच्यावर तोफ डागली होती. तर या सभेत मार्गदर्शन करणाऱ्यांनीही बांगर यांच्यावर तोंडसुख घेतले होते. दरम्यान, विरोधकांच्या एकाही टिकेला उत्तर न देता आमदार बांगर यांनी गावपातळीवरील सर्वच समाजातील कार्यकर्त्यांची एकत्रीट मोट बांधून प्रचाराचे नियोजन केले. नेत्याच्या सभेत वेळ घालवण्या एेवजी गाव भेटीवर त्यांनी भर दिला होता. दुसरीकडे वसमत विधानसभेतही राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनीही हाच कित्ता गिरविला. त्यांनीही पक्षाच्या नेत्यांची सभा न घेता मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवरच भर दिला. त्यातून महायुतीच्या या दोन्ही आमदारांनी कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुक लढविली अन विजय मिळवत इतिहास घडविला आहे. त्यांच्याकडून आता मोठ्या प्रमाणावर विकास कामांची अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे. आता पालकमंत्रीपदाची माळ कोण्याच्या गळ्यात पडणार हिंगोलीसाठी कमी वेळेस हिंगोली जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाला आहे. मागील काही वर्षात जिल्हयाबाहेरील पालकमंत्री नियुक्त झाल्यामुळे जिल्हयाचे प्रश्‍न म्हणावे तसे सुटलेच नाही. आता तीनही विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरु झाली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article