माढ्यात विरोधी नेते जोडले:परफेक्ट नियोजनामुळे अभिजित पाटलांनी जिंकला माढ्याचा गड
2 hours ago
1
माढामाढ्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असलेल्या आमदार बबनराव शिंदेंच्या माढ्याच्या राजकारणात प्रवेश करुन जोरदार राजकीय धक्का देण्याचे काम अभिजीत पाटील यांनी केले आहे.अभिजीत पाटील यांनी आमदार बबनराव शिंदेच्या घरातील राजकीय सत्ता हाती घेतली आहे. मोहिते-पाटलांनी शिंदे कुटुंबाला राजकीय पटलावरून जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला केले आहे. अभिजित पाटलांना अवघ्या तीन महिन्यात प्रामाणिक कार्यकर्त्यांची मिळालेली साथ, जनतेत निर्माण झालेली परिवर्तनाची लाट वाढीव मतदानाच्या रूपातून समोर आली. यामुळेच ३० वर्षांच्या एकहाती सत्तेचे परिवर्तन झाले.अभिजित पाटील यांना आमदार करण्यात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे योगदान असून, प्रचारात आक्रमकपणे आमदार शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. विजयसिंह मोहिते-पाटील आजारी असतानाही प्रकृतीची पर्वा न करता अनेक सभेत सहभागी झाले. शरद पवारांचे आक्रमक भाषण मतदार संघात राजकीय परिणाम करून गेली. आमदार बबनराव शिंदे यांनी निवडणुकीच्या अंतिम टप्यात विरोधी गटातील नेते जोडले. त्यांना प्रचारातही सोबत घेतले. आम्हीच निवडणूक जिंकणार आम्हाला कोणत्याही विरोधकांच आव्हान वाटतं नाही. शरद पवाराच्या सभेचा परिणाम आमच्या मतांवर होणार नाही असे म्हणत आमदार बबनराव शिंदे व पुत्र रणजितसिंहानी व्यक्त केलेला अतिआत्मविश्वास नडला गेला आहे. शरद पवारांनी टेभुर्णीतील सभेत साधं सुधं पाडायचं नाही..महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे...हे केलेले वक्तव्य..अभिजित पाटलांच्या रूपाने आमदार बबनराव शिंदेना मिळालेला तगडा विरोधी चेहऱ्याचा उमेदवार माढा मतदार संघातील मराठा समाजातील मतदारांनी ही पाटलांना दिलेली साथ. अभिजित पाटलांनी प्रचार यंत्रणेत राबवलेले परफेक्ट नियोजन हेही फायदेशीर ठरले. अभिजित पाटलांचे हे मुद्दे ठरले प्रभावी
अभिजित पाटील यांनी निवडणूकीच्या तीन महिन्यांपूर्वी माढा कृषी सांस्कृतिक महोत्सव, दहीहंडी उत्सव, कुस्त्यांचे मैदान, बैलगाडा शर्यती यांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचले. महायुतीच्या साठेचे डिपाॅझिट जप्त
महायुतीच्या अजित पवार गटाच्या उमेदवार अॅड.मिनल साठेंना केवळ १३ हजार ३८१ इतकी मते मिळाली.त्यामुळे त्याचे डिपाॅझिट जप्त झाले. लाडकी बहीणची साथ मिळाली नाही. जनतेची नाराजी भोवली आमदार शिंदे यांनी निवडणूक कालावधीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे या प्रमुख विरोधकांना एकत्रित घेतले गेले. सत्तेचे केंद्रीकरण, मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती, साखर कारखानदारी भोवती केंद्रीत राजकारण या प्रकारामुळे विरोधकांनी मतदारांच्या मनात निगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार केले. शेतकऱ्यांच्या जमिनींवर परस्पर काढलेले कर्ज,मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल व्हायरल झालेली वक्तव्ये, नातेवाइकांची ठेकेदारी या सारख्या अनेक प्रश्नांमुळे निर्माण झालेली जनतेच्या मनातील नाराजी शिंदेंना या निवडणुकीत भोवली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)