उद्धव ठाकरे यांना आत्मपरिक्षण करण्यासाठी आत्माच राहिला नाही, असं वक्तव्य करत अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोलाही लगावला आहे. 'मला सिल्लोड मतदारसंघातून पाडण्यासाठी ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाकडे भीक मागितली.', असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं.
‘मला सिल्लोड मतदारसंघातून पाडण्यासाठी ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाकडे भीक मागितली.’, असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. तर भाजपाकडे भीक मागूनही ठाकरेंना यश आलं नाही, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. यावेळी आम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच हवेत, अशी मागणीही अब्दुल सत्तार यांनी केली. अब्दुल सत्तार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे भीक मागूनही त्यांना यश आले नाही. माझ्या मतदारसंघात त्यांची केविलवाणी अवस्था झाली होती. उद्धव ठाकरे यांना आत्मपरिक्षण करण्यासाठी आत्माच राहिला नाही, असं वक्तव्य करत अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोलाही लगावला आहे. दरम्यान सिल्लोड मतदारसंघातून महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना रंगला होता. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुरेश बनकर हे विधानसभेच्या रिंगणात होते तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार मैदानात होते. महाविकास आघाडीच्या सुरेश बनकर यांना 1 लाख 34 हाजर 2 मतं पडली तर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांना 1 लाख 36 हजार 951 मतं मिळून ते सिल्लोडमधून विजयी झालेत.
Published on: Nov 24, 2024 01:29 PM