पंढरपूरातील निकालावरून मनसे न्यायालयात जाणार:ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा दिलीप धोत्रे यांचा आरोप
3 hours ago
1
मनसेचे नेते दिलीप धोत्रे ईव्हीएमच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहे. दिलीप धोत्रे यांनी एव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा आरोप केला. व्हीव्हीपॅटच्या स्लिपची फेर मोजणी करावी, अशी काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. पण त्यांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायलायात दाद मागणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचा पंढरपूर मतदारसंघातून पराभव झाला. समाधान औताडे यांनी 1 लाख 22 हजार 595 मतांनी धोत्रे यांना पराभूत केले. दिलीप धोत्रे यांना केवळ 2 हजार 568 मते मिळाली. या मतदारसंघात ईव्हीएमचा 100 टक्के घोटाळा झाला, असा आरोप त्यांनी केला. काय म्हणाले दिलीप धोत्रे?
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीनचा 100 टक्के घोटाळा झाला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व्हीव्हीपॅट स्लीपच्या फेरमतमोजणीची मागणी केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी ती मागणी फेटाळून लावली. म्हणून आता निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात व्हीव्हीपॅटच्या सर्व स्लीपची मोजणी करण्याची मागणी करणार आहे. कारण या ठिकाणी 100 टक्के ईव्हीएमचा घोटाळा झाल्याची माझी खात्री आहे, असे दिलीप धोत्रे म्हणाले. हाती आलेला निकाल धक्कादायक होता
माझे 15 वर्षांपासूनचे असणारे काम पाहता मला निवडणुकीसाठी उत्स्फूर्त मिळाला होता. जनतेनी वर्गणी गोळा करून मला निवडणुकीत उभे केले होते. आम्ही रेल्वे इंजिनला मतदान केल्याचे प्रत्येक मतदार सांगत होता. पण हाती आलेला निकाल धक्कादायक होता. अतिशय कमी मते मला पडली. याचा अर्थ याठिकाणी ईव्हीएम घोटाळा झाला आहे. माझा न्यायालयावर विश्वास आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दादा मागणार आहे, असे धोत्रे म्हणाले. ईव्हीएम विरोधात सर्वांनी एकत्र यावे
सगळ्यांनी एकत्र ईव्हीएम मशीनचा नायनाट केला पाहिजे. ईव्हीएम मशीनने अनेकांचे करिअर उद्ध्वस्त केले आहेत. वर्षानुवर्षे जनतेची कामे केली. जनतेने त्यांना भरभरून मतदान केले. ज्या लोकांना वाटते आपल्याला मतदान झाले नाही, अशा सर्व लोकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन दिलीप धोत्रे यांनी केले. हे ही वाचा... जनतेच्या न्यायालयातही न्याय विकत घेतला:मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुजरातची निवड करावी, संजय राऊतांचा हल्लाबोल माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वेळीच आमदार अपात्रतेचा योग्य निर्णय दिला असता, तर आज महाराष्ट्रातील चित्र वेगळे असते. कालचा निकाल आधीच ठरवला होता. फक्त मतदान होऊ दिले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. हे सरकार गुजरात लॉबीला हवे होते, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी गुजरातला जावे, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)