शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीत फसवणूक:महिलेला ऑनलाइन बसला 34 लाखांचा गंडा

3 hours ago 1
मोतीलाल ओसवाल या शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून एका महिलेस अल्पावधीत चांगल्याप्रकारे परतावा देतो, असे अमिष दाखवून तिची ऑनलाइन ३४ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात योगिता जनार्दन झानपुरे (वय-४८,रा. तांबडी जोगेश्वर गल्ली,पुणे) यांनी अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार ९/९/२०२४ ते २८/९/२०२४ दरम्यान घडला आहे. झानपुरे यांना सुरुवातीला आन्या स्मिथ नावाच्या अनोळखी महिलेने फोन करुन मोतीलाल ओसवाल या शेअर ट्रेडिंग कंपनीत एजंट असल्याचे भासवले. अशाचप्रकारे क्रांती मारवाह महिलेने तिच्याशी फोनवर ओळख करुन तिला मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेज या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करुन घेतले. इतरांना कशाप्रकारे फायदा गुंतवणुकीवर मिळत आहे, असे दाखवून महिलेस गुंतवणुक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला काही प्रमाणात परतावा देऊन त्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता ३४ लाख २० हजार रुपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत. गॅस बील बहाण्याने चार लाखांचा गंडा आंबेगाव येथे रहाणारे अभिजीत रामचंद्र मुदगुल (वय-४१) हे राहते घरी असताना त्यांना अनोळखी व्यक्ती देवेश जोशी याने संर्पक केला. तक्रारदार यांना त्यांचे एमएनजीएल गॅस कनेक्शन डिसक्नेक्ट द्वारे गॅस बील अपडेट करण्याचे बाबत माहिती दिली. अ‍ॅपेक हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगून ते रन करण्यास सांगून त्यावर बँक खात्याची माहिती भरण्यास भाग पाडून, मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेऊन चार लाख २० हजार रुपये रक्कम परस्पर संगणकीय तंत्रज्ञान वापरुन हस्तांतरित करुन फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article