शैक्षणिक वर्ष अर्धे संपले; ‘स्वाधार’चा नाही ‘आधार’:यंदा एक हजार, गतवर्षीच्या 483 विद्यार्थ्यांनाही अद्याप लाभ नाही

2 hours ago 2
‘स्वाधार’ योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करते. ही मदत गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना दिली जाते. यात जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयांची आर्थिक मदत होत आहे. परंतु, शैक्षणिक वर्ष अर्धे संपत आले तरी या शैक्षणिक वर्षांसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या सुमारे एक हजारांवर विद्यार्थ्यांना अद्याप छदामही मिळालेला नाही. त्यामुळे रुमचे भाडे, मेसच्या पैशांसह शैक्षणिक साहित्य खरेदीसाठीही विद्यार्थ्यांना पैशाची जमवाजमव करावी लागत आहे. शिवाय गतवर्षीच्या ४८३ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजना २०१६-१७ पासून सुरु केली. या योजनेअंतर्गत इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या परंतु, समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार' योजनेतून मदत केली जाते. यात सध्या या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात सुमारे १ हजार विद्यार्थ्यांनी ‘स्वाधार’च्या लाभासाठी अर्ज केला होता. यातील २५० अर्ज त्रुटीत निघाले आहेत. शैक्षणिक वर्ष विद्यार्थी रक्कम वाटप २०२१-२२ ४५ १६,६५,००० २०२२-२३ १,०६८ ४,२६,३९,२०० २०२३-२४ १,३८० ५४,८६,१९५ एकूण २,४८३ ९,९१,६७,३९५ ^शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून आम्ही अकोला शहराकडे येतो. यात पारिवारिक आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. त्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्याला स्वाधार योजनेचा लाभ गरजेचा आहे. परंतु, या योजनेच्या पैशातून कॉलेज विविध प्रकारची फीस आकारते. त्यात हातावर तुटपुंजे रुपये येतात. सध्या योजनेचे पैसे आले नसल्यामुळे रूमचे भाडे देणे, मेस, कॉलेजला जाण्यासाठी पैसेच नाहीत. - रोहित वानखडे, विद्यार्थी.अकोला. या वर्षापासून ऑनलाइन नोंदणी सुरू ^या वर्षापासून ‘स्वाधार’च्या अर्जांची नोंदणी ऑनलाइन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना देय लाभासाठी कार्यालयामार्फत प्रक्रिया सुरू आहे. परंतु. सध्या व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट (व्हीपीडीए) ही नवी प्रणाली शासनाने लागू केल्याने विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी बँक खात्या विषयीची त्रुटी पूर्ण करायची आहे. -डॉ. अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अकोला. रूम भाडे, मेसचे पैसे देणे शक्य नाही

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article