श्री अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त 3 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम:खामगाव येथे उत्सव सोहळ्यानिमित्त जय्यत तयारी सुरू

2 hours ago 2
महाराजा श्री अग्रसेन यांची ५१४९ वी जयंती यावर्षी दि.२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री अग्रसेन भवन, बालाजी प्लॉट खामगाव येथे करण्यात आले आहे. यावर्षी श्री अग्रसेन जयंती समारोह उद्योगपती संचालक अमित कॉट फायबर मलकापूर सुभाष द्वारकादास चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तर सत्कारमूर्ती नवीन भव्य अग्रसेन भवन निर्माणकरता भुमी दानकर्ता आकाश श्यामजी अग्रवाल आश्यागो खामगाव हे राहतील. जयंती समारोह २०२४ च्या अध्यक्षा पद्मावती कैलासचंद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत तसेच अग्र ध्वजारोहण डॉ.गोकुलचंद शंकरलाल झुनझुनवाला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२४ चे अध्यक्ष मनोज मधुसूदन अग्रवाल , श्री अग्रसेन भवन मंडळ खामगावचे अध्यक्ष सुरज बजरंगलाल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत श्री अग्रसेन जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी स्विमिंग स्पर्धाचे आयोजन जी.एस.कॉलेज स्विमिंग पुल येथे करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत अग्र वुमन्स प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता डॉ.गोकुलचंद शंकरलाल झुनझुनवाला यांच्या हस्ते श्री अग्रसेन भवन येथे ध्वजारोहण संपन्न होणार आहे. तसेच सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजेपासून श्री अग्रसेन भवन येथे सांस्कृतीक कार्यक्रमात एकल नृत्य स्पर्धा, ग्रुप डान्स चे आयोजन करण्यात आले आहे विविध स्पर्धा अशा रविवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रंग भरो स्पर्धा, चेस स्पर्धा दुपारी १२ वाजता घेण्यात येणार आहे. एपीएल अग्र प्रिमीअर लिग बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सकाळी ८ वाजेपासून सिटी स्पोर्ट टर्फ, हनुमान व्हिटॅमिन जवळ खामगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस रू.११ हजार, द्वितीय रू. ७१०० तसेच बेस्ट बॅटस्मन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ दि मॅच असे विविध बक्षीस सुध्दा देण्यात येणार आहे. असे आयोजक अग्रवाल युवक मंडळ द्वारे कळवण्यात आले आहे. सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता हेल्दी बेबी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दुपारी ३ ते ३.३० तोरण बनाओ स्पर्धा ,दुपारी ३.३० ते ४ गमला बनाओ स्पर्धा,दुपारी ४ ते ४.३० शिवलिंग बनाओ स्पर्धा, मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी रंगोली बनाओ स्पर्धा,दुपारी ३.३० ते ४ टॅटू बनाओ स्पर्धा, दुपारी ४.३० ते ५.३० रिल्स बनाओ स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता हाऊजी हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक जि.एस.कॉलेज येथे बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता सायबर क्राईम सिक्युरिटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६वाजता आनंद मेलाचे आयोजन श्री अग्रसेन भवन कार्यालय येथे करण्यात आले आहे. समारोप शोभायात्रा व मोटार सायकल रॅलीने गुरूवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता महाराजाधिराज श्री अग्रसेन यांची शोभायात्रा अग्रसेन भवन येथून काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री अग्रसेन भवन मंडळ, श्री अग्रवाल युवक मंडल, श्री अग्रवाल महिला मंडळ, श्री अग्रवाल बहू बेटी मंडल, श्री अग्रसेन जयंती उत्सव समिती २०२४, श्री अग्रसेन स्मारक समिती द्वारे करण्यात आले आहे. वरील माहिती प्रसिध्दी प्रमुख राजकुमार गोयनका व विक्रम अग्रवाल यांनी दिली .

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article