संजय राऊतांकडून भाजपच्या नेत्यांचे गुणगान:त्यांनी भूमिका का बदलली हे स्पष्ट करावे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची मागणी
2 hours ago
2
खासदार संजय राऊत यांनी वेळोवेळी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली. त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारीचे वहन करण्याचे काम त्यांनी केले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी आता त्यांची भूमिका बदलली आहे. ते आता आमचे नेत्यांचे गुणगान गात आहेत. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. विधानसभेत वैध विरोधी पक्ष नसल्याची उणीव भासणार असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पाटील म्हणाले,पक्ष संघटना मध्ये काम करताना पक्ष श्रेष्ठी त्यांचे लक्ष्य आमच्यावर ठेवत असतात. निवडणूक झाल्यावर निकाल विश्लेषण करण्यात आले आहे. भाजप नेहमी नवीन नेतृत्व शोध घेत असते आणि त्यांना जबाबदारी देते. राजस्थान आणि मध्यप्रदेश प्रमाणे नवीन प्रयोग राज्यात राबवणार का याबाबत मला कल्पना नाही. पक्षाची केंद्रीय समिती असून त्यात विविध विषय चर्चा होऊन त्यात वेगवेगळ्या जबाबदारी वाटप करण्यात येईल. माझ्या मंत्रिपदाबाबत देखील वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील. सर्वच्च न्यायलयाने ईव्हीएम बाबत स्पष्ट मत मांडले असून विरोधकांचे सर्व आरोप मोडीत काढले आहे. विरोधक यांनी केवळ आरोप करण्यापेक्षा ते विरोधकानी सिद्ध करावे. शिवसेना नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी यांनी देखील विविध तीर्थक्षेत्र स्थळी, पूजा करत आहे. त्यांना आपल्या व्यक्तीस चांगली जबाबदारी मिळावी अशी अपेक्षा आहे. त्याच प्रमाणे भाजप कार्यकर्ते देखील ठिकठिकाणी पूजा करून वेगवेगळ्या मागणी पूर्तीसाठी प्रयत्न करत आहे. परंतु भाजपचे वरिष्ठ नेते कोणाला मंत्री पद द्यवचाये याबाबत निर्णय घेतील. शहरात हेल्मेट सक्ती नाही आमदार हेमंत रासने म्हणाले, हेल्मेट सक्ती बाबत बातम्या येतात त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांना विचारणा केली. त्यांनी सांगितले की, पुण्यात असा आदेश लागू नाही त्यामुळे हा आदेश महामार्ग पुरता मर्यादित आहे. ज्याठिकाणी शहरात वाहने २० आणि ३० किमी वेगाने चालतात त्याजागी हेल्मेट सक्ती असू नये असे माझे मत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)