दोन भावांना मारहाण pudhari
Published on
:
28 Nov 2024, 12:25 pm
Updated on
:
28 Nov 2024, 12:25 pm
नगर तालुक्यातील साकत शिवारातील मुंगसे वस्तीवर जुन्या वादातून सातजणांच्या टोळक्याने दोघा सख्या भावांना कुर्हाड, लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि.26) सकाळी 9.30 वाजता घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले अनिल राजू मुंगसे यांच्यावर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत दीपक राजू मुंगसे (वय 20, रा.मुंगसे वस्ती, साकत) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी प्रवीण शंकर पवार, अक्षय शंकर पवार, शंकर मुरलीधर पवार, बंडू बाबूराव निमसे, गणेश बंडू निमसे, अभिषेक अर्जुन निमसे, सागर अशोक मुंगसे (सर्व रा. साकत, ता.नगर) या सातजणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
फिर्यादी दीपक मुंगसे हे मंगळवारी (दि.26) सकाळी 9.30 वाजता शेतात कांद्याच्या रोपास पाणी भरत असताना यातील आरोपींंनी संगनमत करून काठ्या, गज, लोखंडी रॉड, कुर्हाड घेऊन अनिल मुंगसे यांच्या पाठीमागे पळत येऊन त्यांपैकी प्रवीण पवार याने लोखंडी रॉडने अनिलच्या डोक्यात हल्ला केला. अक्षय पवारने कुर्हाडीने अनिलच्या डोक्यात वार करीत त्याने तो अडविला. शंकर पवार याने अनिलच्या पाठीत दगडाने मारहाण केली.
अभिषेक निमसे याने अनिल यास लाकडी दांड्याने मारहाण केली. सागर मुंगसे याने अनिल यास कवळ घातली गणेश निमसे याने अनिल व दीपक याच्या पाठीत लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
पोलिसांनी या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वांढेकर करीत आहेत.