Published on
:
28 Nov 2024, 2:30 pm
Updated on
:
28 Nov 2024, 2:30 pm
नागपूर : एकीकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नागपूरला मिळणार म्हणून राजकारण तापलेले असताना विदर्भात थंडीची हुडहुडी भरली आहे. सध्या नागपूर,ब्रम्हपुरी विदर्भ सर्वात अधिक थंड झाले आहे. जागोजागी रात्री शेकोट्या पहायला मिळत आहेत. उनी कपडे घातल्याशिवाय कुणीच बाहेर निघताना दिसत नाही.
गेल्या सहा दिवसात तापमान साडेतीन अंशाने खाली आले आहे. 22 नोव्हेंबरला 29.1 कमाल तर किमान तापमान 15.2 अंश सेल्सियस होते. 27 नोव्हेंबरला ते कमाल 30.4 तर किमान 11.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. आज गुरुवारी नागपूर 11.8 ,ब्रम्हपुरी 11 तर गोंदियात किमान तापमान 11.4 अंश सेल्सिअस नोंद झाली. थंडी वाढताच गणेशपेठ बस स्थानक परिसरातील तिबेटी स्वेटर बाजारात दिवसभर,रात्री उशिरापर्यंत गर्दी पहायला मिळत आहे.
उपराजधानी नागपूरचे किमान तापमान हिवाळी अधिवेशन काळात 6 अंशपर्यंत खाली येते.यावर्षी थंडी काहीशी उशिराने अनुभवास आली. आता नोव्हेंबर संपतांना थंडी वाढली आहे. हवामान विभागाने डिसेंबर कडक थंडीचा राहणार असल्याचे संकेत दिले आहे. किंबहुना पुढील तीन महिने थंडीचे असल्याचा अंदाज वर्तविला आहे. गोंदिया 11.9 तर नागपूर 11.7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले. अकोला, भंडारा,बुलढाणा, गडचिरोली, ब्रह्मपुरी येथे किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान आहेत.