उदगीर (Latur part circle) : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अंदाज आहे की, 80 टक्के अंधत्व एकतर टाळता येण्याजोगा किंवा उपचाराने बरा होऊ शकतो. यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, अपवर्तक त्रुटी दृष्टी दोष आणि बालपणातील अंधत्वाची काही प्रकरणे यांचा समावेश होतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा अंदाज आहे की, युनायटेड स्टेट्समधील अर्धे अंधत्व टाळता येण्यासारखे आहे. या धर्तीवर आपणही या परिमंडळात अंधत्व निवारण जनजागृती मोहीम यावर काम करू, असे प्रतिपादन आरोग्य सेवा संचालक डाॕ. अर्चना भोसले यांनी केले.
उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्ररूग्णालयाच्या 19 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या (Latur part circle) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रामप्रसाद लखोटिया तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले, राजू गायकवाड दिव्यांग विभाग लातूर, डॉ. संजय ढगे सहायक उपसंचालक आरोग्य सेवा लातूर, डॉ. दोडके, डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. हारीश सुळे, डॉ. दोडके, ईश्वरप्रसाद बाहेती प्रदीप बेद्रे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते शिबीर संयोजक यांना प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. पुढे बोलताना उदयगिरी नेत्ररूग्नालयाचे केवळ नाव ऐकून होते. पण आज पाहून खरोखर आनंद झाला. माझ्या परिमंडळातील ही खूप मोठी संस्था अंधत्व निवारणाचे कार्य डॉ. रामप्रसाद लखोटिया व त्यांची सर्व टीम गेली 18 वर्षापासून करत आहे. यासाठी माझे शब्द अपुरे आहेत, असे हे कार्य चालू आहे. या संस्थेच्या माध्यमातून आपण पूर्ण परिमंडळात पुढील कालात अंधत्व निवारणाचे कार्य असेच पुढे चालू राहील, असे त्या म्हणाल्या.
या (Latur part circle) कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. रामप्रसाद लखोटीया यांनी केले,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी आदेप्पा यांनी केले. या कार्यक्रमास उदगीर, जळकोट तालुक्यातील शिबीर संयोजक, डॉक्टर, सर्व कर्मचारी व उमेद महिला पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.