Published on
:
28 Nov 2024, 2:38 pm
Updated on
:
28 Nov 2024, 2:38 pm
नागपूर : राज्यात नवे सरकार स्थापन होताच विशेष अधिवेशन होणार असून या अधिवेशनातच नागपुरातील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त निश्चित होणार आहे. सार्वजनिक बांधकामा विभागामार्फत रवी भवन, विधान भवन, आमदार निवास येथील पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे.
कदाचित दुसरा किंवा तिसरा आठवडा अर्थात ९ किंवा १७ डिसेंबरपासून हे अधिवेशन होण्याची चिन्हे आहेत. सरासरी दोन आठवड्यांच्या या अधिवेशनात भक्कम सरकार, कमकुवत विरोधक असा अनुभव नागपूरकरांना येणार आहे. विशेष अधिवेशन संदर्भात परिपत्रक काढण्यात आले असले तरी यात तारखेचा निश्चित असा उल्लेख झालेला नाही. यामुळेच गुरुवारी (दि.२८) दिल्लीत होणाऱ्या मुख्यमंत्री निवड आणि सरकार स्थापनेच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कडाक्याच्या थंडीत पुन्हा एकदा नागपूरचे हिवाळी अधिवेशन तापण्याची चिन्हे आहेत.