देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. File Photo
Published on
:
28 Nov 2024, 2:35 pm
Updated on
:
28 Nov 2024, 2:35 pm
नागपूर : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जो निर्णय होईल तो मान्य राहील, असे सांगत मुख्यमंत्रीपदाबाबत आपली अडचण नाही, अशी भूमिका घेताच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
नागपुरातील फडणवीस यांच्या निवासस्थानी अगदी घराबाहेर 'महाविजयाचे शिल्पकार' असे भव्य होर्डिंग आज समर्थकांकडून लावण्यात आले आहे. यावरून ही बाब अधिकच स्पष्ट झाली आहे. महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले असून एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत. या महाविजयात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे यावेळी मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागणार हे निश्चित मानले जात आहे. गेले दोन दिवस त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.