सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी माजी नगरसेवक दांपत्याचे उपोषण:वारसा हक्काने स्वेच्छानिवृत्ती नोकरीचा प्रश्न मार्गी न लागल्याने आंदोलन

2 hours ago 1
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सफाई कामगार, झाडू कामगार यांच्या प्रलंबित लाड पागे कमिटीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने स्वेच्छानिवृत्ती नोकरीचा प्रश्न मार्गी न लागल्याने शहरातील माजी नगरसेवक दांपत्य सफाई कामगारांसह आज श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले. श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या सफाई कामगारांनी त्यांच्या वारसांना लाड पागे शासकीय कमिटीच्या शिफारशीनुसार स्वेच्छा निवृत्तीद्वारे सेवानिवृत्तीचा अर्ज ४ महिन्यांपूर्वी सादर केला होता. सफाई कामगारांनी चतुर्थ श्रेणी कायम आस्थापनेवर सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय अध्यादेशानुसार १५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कामगारांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत शारिरीकदृष्ट्या विकलांग अथवा असक्षम दाखला देणे गरजेचे नसताना नगरपरिषदेच्या उप मुख्याधिकाऱ्यांनीनि यमबाह्य त्यांना अनफिट सर्टिफिकेट देण्याबाबत सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली. सफाईकामगारांना बेकायदेशीरपणे नोटीसा पाठवल्या होत्या. परंतु तत्कालीन मुख्याधिकारी जाधव यांनी सदरच्या नोटिसा मागे घेतल्या असून त्यानंतर कामे रेंगाळली. सफाईकामगारांनी नोकरीसंदर्भातील अर्ज देऊन १२० दिवस पूर्ण होत असून शासकीय अध्यादेशानुसार एक महिन्याचा कालावधी ग्राह्य धरला जातो. लवकरच कोणत्याही क्षणीविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे नोकरी मिळणेकामी अडथळा निर्माण होऊ शकतो. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत मागील काही दिवसात भ्रष्टाचाराच्या अनेक बाबी पुढे आल्याने सर्वसामान्यांची बिकट परिस्थिती झाली. सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, अन्यथा आचारसंहितेपूर्वी सेवेमध्ये सामावून न घेतल्यास कामबंद आंदोलन करू. न्याय मिळाला नाही तर नाईलाजाने शनिवारी स्वच्छता काम बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपोषणकर्ते माजी नगरसेविका प्रणिती चव्हाण व दीपक चव्हाण, सफाई कामगार जितेंद्र चव्हाण, चेतन बागडे, राहुल आठवाल, बंटी चव्हाण, अनिल झिंगारे, संजय चव्हाण आदींनी दिला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article