दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक दाबल्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात २० वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात २४ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वारजे परिसरातील माई मंगेशकर रूग्णालयाजवळ घडला आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरूद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गौरी संजीवकुमार कलशेट्टी (वय २० रा. शिवाजी चौक, आंबेगाव) असे ठार झालेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक गणेश बानगुडे (वय २४ रा. नर्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी रोहित कलशेट्टी (वय ४०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी आणि अभिषेक हे २४ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून देव दर्शनासाठी जात होते. वारजे माळवाडी परिसरात समोरून भरधाव वेगातील मोटार चालकामुळे अभिषेकने दुचाकीचा ब्रेक दाबला. त्यामुळे दुचाकी घसरून गौरी खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस नरळे पुढील तपास करीत आहेत. विक्रीस आणलेला अडीच लाख रूपयांचा गांजा जप्त गांजा तस्करीच्या तयारीत असलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून २ लाख ४३ हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. देव नरेश तनेजा ( वय २४ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड हे पथकासह २६ नोव्हेंबरला भारती पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत होते. पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना कात्रज चौकात एकजण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तनेजाला ताब्यात घेतले. ही कामगिरी उपायुक्त निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, एपीआय नितीनकुमार नाईक, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, नितीन जगदाळे,युवराज कांबळे, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, निलम पाटील यांनी केली .
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)