सलमान खानला पुन्हा एकदा धमकी, 5 कोटीची मागणी:..तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट करू

2 hours ago 1
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आणखी एक धमकी मिळाली आहे. यावेळी ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याआधीही सलमानला धमक्या मिळाल्या असून त्याच्या घरावर गोळीबारही झाला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर सलमान खान यांनाही बाबा सिद्दीकी सारखे मारू असे धमकी देणाऱ्यांनी म्हटले आहे. सलमानपर्यंत पोहोचणे कठीण, त्यामुळे जवळचे टार्गेटवर 'बाबा सिद्दीकी फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर त्यांच्या कार्यक्रमांचे अपडेट्स पोस्ट करायचे. त्यांच्या हत्येचे आरोपी दोन महिन्यांपासून बाबा सिद्दिकींचे सोशल मीडिया अपडेट्स फॉलो करत होते. चौकशीत त्यांनी ही कबुलीही दिली आहे. या अपडेट्समुळे त्यांचा मागोवा घेणे सोपे झाले. मुंबई पोलिसांच्या एका निरीक्षकाने दिव्य मराठीशी बोलताना हा दावा केला आहे. ते सांगतात की, बाबा सिद्दिकी यांच्यावर डिजिटल रेकी केली जात होती. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शूटर्सनी सोशल मीडिया ट्रॅक करण्याचे काम केले नाही. यामध्ये इतर लोकांचा सहभाग होता. बाबा सिद्दीकींचे लोकेशन ट्रॅक करून ते शूटर्सना गाइड करत असे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील प्रॉपर्टी अँगलचाही पोलिस तपास करत आहेत. 12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशानच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. लॉरेन्स गँगच्या नावाने खुनाची जबाबदारी स्वीकारणारा शुबू ऊर्फ ​​शुभम अद्याप फरार आहे. मुंबई पोलिसांची पाच पथके आणि गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी सेल तपासात गुंतला आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article