सातपूर कॉलनीतील मीनाताई ठाकरे सार्वजनिक उद्यानात मद्यपींचा उपद्रव:टवाळखोरांकडून विद्यार्थिंची सुरक्षितता धोक्यात

2 hours ago 2
सातपूर परिसरातील सार्वजनिक उद्यान तसेच खुल्या जागा व मोकळी मैदाने मद्यपींचे अड्डे बनले आहेत. या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. टवाळखोर मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहे. परिसरात जवळच शाळा असल्याने या टवाळखोरांकडून विद्यार्थिंची सुरक्षितता धोक्यात आहे. सातपूर कॉलनी मीनाताई ठाकरे सार्वजनिक उद्यान परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. मद्यपान करण्यासाठी उद्यानाचा वापर केला जात असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. याबाबत या मद्यपींना रोखले वा टोकले असता आरडाओरड व दमबाजी करण्याचा प्रकार होत आहे. या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांकडून होत आहे. सायंकाळी फिरण्यासाठी व जॉगिंग करणाऱ्यांसमोरच मद्यपींचा उपद्रव आहे. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कारवाई होणार कधी? ^दुचाकींवर रात्री कर्णकर्कश हॉर्न वाजवत मद्यपींकडून आरडाओरड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न होतो. यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी. - सीमा निगळ, माजी नगरसेविका

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article