सातारा : कंटेनरने दहा वाहनांना ठोकरले; 12 जखमी

2 hours ago 2

कंटेनरने दहा वाहनांना ठोकरले

पुढारी वृत्तसेवा

Published on

23 Sep 2024, 1:16 am

Updated on

23 Sep 2024, 1:16 am

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस वळणाच्या पुढे भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने दहा वाहनांना ठोकरल्याची घटना घडली. या अपघातामध्ये 12 जण जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या थरारामुळे महामार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागून वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात रमेश शामराव पाटील व राज रमेश पाटील (दोघे रा. वाकुर्डे, ता. शिराळा जि. सांगली) व सजल गिरीराज शर्मा (रा .पुणे) अशी अपघातातील गंभीर जखमींची नावे आहेत. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावरून एस वळणावरून पुढे गेल्यानंतर कंटेनर (क्र. आर. जे. 09 जीडी 2898) वरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे या कंटेनरने पुढे चाललेल्या दहा वाहनांना एका मागून एक जोराची धडक दिली. या धडकेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना मदत केली. वास्तविक रविवारची सुट्टी असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. अपघातातील वाहने महामार्गावरुन बाजूला करेपर्यंत काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यातून वाहनांना मार्ग काढताना अडचण येत होती. पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article