साताऱ्यात महायुतीला बसणार झटका:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने तुतारी हाती घेण्याचे दिले संकेत

2 days ago 2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली. त्यानंतर आता सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या साताऱ्यातील एका बड्या नेत्याने उमेदवारीच्या मुद्यावरून पक्षाविरोधात बंडखोरी करण्याचे संकेत दिलेत. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात महायुतीला जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत. ते म्हणाले, आम्ही पूर्ण मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली. त्यात विद्यमान आमदाराविरोधात जनतेत रोष दिसून आला. आपल्या घरातच सर्व पदे असावीत अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड विरोध होत आहे. मी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यांनीच मला वाई विधानसभा मतदारसंघाची बांधणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मी तयारी केली होती. पण अचानक अजित पवार महायुतीमध्ये आले. त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून ही जागा त्यांच्याच पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. फडणवीस यांनी आम्हाला थांबवले पुरुषोत्तम जाधव पुढे म्हणाले, माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी मला संयम बाळगण्याचा सल्ला दिला. त्या निवडणुकीत मला किमान एक ते दीड लाख मते मिळाली असती. त्यामुळे महायुतीचा उमेदवार संकटात सापडला असता. दरवेळी मलाच थांबवले जाते. त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी राजकारणात यायचे की नाही? असा प्रश्न आम्हाला पडत आहे. शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत सातारा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे याठिकाणी शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशीच निवडणूक होार आहे. आतापर्यंत खंडाळा तालुक्याला प्रतिनिधित्व मिळाले नाही. पण मी गेली 20-22 वर्षांपासून संघर्ष करत आहे. विशेषतः माझ्यावर कोणता आरोपही नाही. त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक सक्षम पर्याय ठरू शकतो. माझी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असून, मला संधी हवी आहे. मला संधी मिळाली, तर निश्चितच मी त्याचे सोने करेन, असेही पुरुषोत्तम जाधव यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवण्याचे संकेत देताना म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article