सुनील केदारांनी तरुणांना सट्ट्याचा, वाळू चोरीचा रोजगार दिला, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुनील केदार इतके वर्ष या मतदारसंघाचे आमदार राहिले. त्यांच्या कार्यकाळात सावनेर मतदारसंघाची काय अवस्था आहे, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, असेही फडणवीस म्हणाले. डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सावनेर येथील सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी जाऊन आलोय. महाराष्ट्राचा अंदाज मला आला आहे. 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण या सरकारमध्ये सावनेरचा आमदार असणार की नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला. परिवर्तनाची यापेक्षा मोठी संधी तुम्हाला जन्मात मिळणार नाही. आता चुकलात तर पक्षातापाशिवाय काहीही हातात राहणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. ही बातमी अपडेट करत आहोत...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)