सुपारी देणारा राजकीय व्यक्ती किंवा बिल्डर...?:बाबा सिद्दिकींच्या हत्येवर प्रकाश आंबेडकरांचा सवाल, CM-DCM च्या राजीनाम्याची मागणी

5 days ago 3
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, अशी टीका विरोधकांकडून सरकारवर होत आहे. आता यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर भाष्य केले आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सुपारी देणारा राजकीय व्यक्ती किंवा बिल्डर आहे का‌? याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, बाबा सिद्दिकींची हत्या ही अत्यंत दु:खद घटना आहे. निवडणुकीच्या तोंडावर तसेच विजयादशमीच्या दिवशी त्यांची हत्या होणे ही निंदनीय बाब आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारले, त्यांनी जबाबदारी घेतली आहे. का मारले? कशासाठी मारले? नेमकी दुश्मनी काय होती? याचा तपास करावा. मारेकऱ्यांनी कोणाकडून सुपारी घेतली याचा देखील शोध पोलिसांनी घेतला पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले. सुपारी देणारा राजकीय व्यक्ती किंवा बिल्डर कोण ? सिद्दिकी यांच्या हत्येमागे राज्यातील संपत्तीवरून किंवा राज्याबाहेरील वाद होता का? असा प्रश्न देखील प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. मारणारी टोळी ही राज्याबाहेरील आहे. त्यांना कोणी प्रोत्साहन दिले? तसेच सुपारी देणारा राजकीय व्यक्ती किंवा बिल्डर कोण आहे का‌? याचा तपास घेतला पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. सिद्दिकींची शनिवारी रात्री झाली हत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या केली. सिद्दिकी यांना वाय-सुरक्षा मिळाली होती, मात्र घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत एकही हवालदार नव्हता. रस्त्यावरील दिवे आणि सीसीटीव्हीही बंद करण्यात आले होते. शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील खेर नगर येथील आमदार पुत्र झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी खुनाच्या 28 तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली. सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, असे लिहिले. या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुप आणि अनमोल बिश्नोई यांना हॅशटॅग करण्यात आले आहे. पोलिस या पोस्टचा तपास करत आहेत. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. त्याने 14 एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. लॉरेन्सची तुरुंगात चौकशी केली जाणार आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article