हिंगोलीत 10 वाजून 41 मिनिटांनी 51 फुटी रावण दहन:जिल्हाभरातून 1 लाखा पेक्षा अधिक नागरिक उपस्थित, फटाक्यांची आतषबाजी

2 hours ago 1
हिंगोलीच्या ऐतिहासीक दसरा महोत्सवात रामलिला कार्यक्रमात राम –रावण युध्दाच्या प्रसंगानंतर विजयादशमी निमित्त शनिवारी ता. १२ रात्री १० वाजून ४१ मिनीटांनी ५१ फुटी रावण दहन करण्यात आले. या सोहळा पाहण्यासाठी जिल्हाभरातून १ लाखा पेक्षा अधिक नागरीक उपस्थित होते. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सव म्हणून हिंगोली येथील दसरा महोत्सव प्रसिध्द आहे. कृषी व औद्योगिक प्रदर्शनी सोबतच रामलिला कार्यक्रम दसरा महोत्सवात मुख्य आकर्षण असते. मागील दहा दिवसांपासून कृषी व औद्योगिक प्रदर्शनीमध्ये उभारण्यात आलेल्या स्टॉलवर नागरीकांची गर्दी होऊ लागली होती. या शिवाय आकाश पाळण्यांसह इतर मनोरंजनाच्या ठिकाणीही बच्चेकंपनीची गर्दी होत होती. दरम्यान, रामलिला मैदानावर मध्यप्रदेशातील कालवंतांनी रामलिला कार्यक्रम सादर केला. रावण दहन कार्यक्रमासाठी रामलिला मैदानावर मागील एक महिन्यापासून पुतळा उभारणीचे काम सुरु होते. त्यानंतर आज सकाळी पुतळा उभारण्यात आला. पुतळा उभारणीसाठी तीन तासांचा कालावधी लागला होता. रामलिला कार्यक्रम व रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी सायंकाळपासूनच नागरीकांनी गर्दी केली होती. सुमारे १ लाखा पेक्षा अधिक नागरीकांच्या उपस्थितीने रामलिला मैदान फुलून गेले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. दरम्यान, रामलिला कार्यक्रमात आज या कार्यक्रमात राम-रावण युध्दाचा प्रसंग सादर करण्यात आला. या युध्दामध्ये रावनाचा वध झाल्यानंतर रावणाच्या ५१ फुटी पुतळ्याचे दहन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या मोबाईलमध्ये या ऐतिहासीक सोहळ्याचे क्षण टिपला आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, महंत कौशल्यदास महाराज, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article