हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे म्हणून सर्व समाज सुरक्षित:स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केले मत
2 hours ago
1
निवडणुकीत हिंदू विरोधी वातावरण निर्माण करणारे पासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. ज्यांनी राम मंदिर आणले त्यांना मतदान करावे असे मी सूचित करतो. हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे म्हणून सर्व समाज सुरक्षित आहे. हिंदू हा स्वतंत्र संप्रदाय नाही तो सर्वसमावेशक आहे. हिंदुत्व आणि मानवता हे समानार्थी वाक्य आहे. सरकार राज्यात कोणाचे येऊ दे पण त्यांनी हिंदू समाज विरोधात वागू नये. व्होट जिहाद करताना आपण प्रतिकार करणार आहे की नाही, स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे त्यामुळे व्होट धर्मयुद्ध आवश्यक आहे. आमच्यावर लादण्यात आलेल्या धर्म युद्धास आम्ही प्रतिकार करत आहे असे मत स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज आणि राज्यातील संतांचे शिष्टमंडळ यांनी रविवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी देहुचे गाथा मंदिर अध्यक्ष हभप पांडुरंग महाराज घुले , आळंदी येथील सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस नाना महाराज चांदीले , उरळीकांचन येथील महानुभव महंत रविराज बाबा पंजाबी, देहू संस्थान विश्वस्त माणिक महाराज मोरे उपस्थित होते. स्वामी गोविंद देवगिरी महाराज म्हणाले, देशाला दिशा देण्याचे काम संत करतात त्यामुळे राज्याला देशील योग्य दिशा दिली पाहिजे. निवडणुकीत कधी आम्ही एकत्र येऊन अशाप्रकारे पत्रकार परिषद घेतली नाही पण यंदा ती गरज वाटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात देशातील सर्व समस्यांचे उत्तर आहे. मागील १५ दिवस मी राज्यात फिरत आहे. देश समर्थ झाला पाहिजे आणि नागरिकांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. हिंदूची मतदानाची इच्छाशक्ती कमी झाली का असे वाटत आहे . कारण ५० ते ५५ टक्के हिंदू यांचे मतदान होत नाही. विशिष्ट समाजाचे एकगठ्ठा मतदान होत असते आणि परदेशातून देखील येऊन मतदान करतात. पण आपल्या इथे काही नागरिक घरात बसून राहतात पण मतदानास जात नाही त्यांनी मतदान करावे. निवडणुकीत दिसून येते की, मुस्लिम समाजाने काही मागण्या कराव्यात आणि त्या काही पक्षांनी जशास तशा मान्य कराव्यात हे मला पटत नाही. मी कोणाच्या विरोधात नाही. काही नवीन रोहिंग्या लोक वातावरणातील शांतता बिघडवत आहे, तशा तक्रारी येत आहे. देशाच्या शांततेला देखील धोका आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)