विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आलेला असताना रत्नागिरीच्या गुहागारमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गुहागरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामुळे गुहागरमध्ये खळबळ उडाली आहे.
वंचितच्या जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला, जेवण करत असाताना ते आले अन्
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ आण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञातांनी अण्णा जाधव यांच्यावर सपासप वार केले. संबंधित घटना ही एका हॉटेलमध्ये घडली. आरोपी आले तेव्हा अण्णा जाधव हे हॉटेलमध्ये जेवण करत होते. पण आरोपींनी त्याची पर्वा न करता अण्णा जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अण्णा जाधव हे जखमी झाले आहेत. या हल्ल्यातून अण्णा जाधव हे बचावले आहेत. पण त्यांना हाताला गंभीर इजा झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
संबंधित घटना ही रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील नरवण फाटा येथील एका हॉटेलमध्ये घडली. अण्णा जाधव हे या हॉटेलमध्ये जेवण करत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी अण्णा जाधव यांच्यावर सपासप वार केले. हल्लेखोरांनी हॉटेलबाहेर अण्णा जाधव यांच्या उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची देखील तोडफोड केली. आरोपींनी अण्णा जाधव यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर ते तिथून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अण्णा जाधव यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे सुद्धा वाचा
संबंधित घटनेतील आरोपींना शोधण्यात आता पोलिसांना यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरु आहे. हा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. कारण दोन दिवसांनंतर विधानसभेसाठी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत गुहागरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला होणं अनपेक्षित आहे. या हल्ल्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हा हल्ला वैयक्तिक कारणास्ताव किंवा आपापसातील वादातून की राजकीय वैमस्यातून करण्यात आला आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींचा शोध लागल्यावरच त्यामागचं कारण उघड होण्याची शक्यता आहे. पण संबंधित घटनेमुळे गुहागरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.