Published on
:
17 Nov 2024, 12:13 pm
Updated on
:
17 Nov 2024, 12:13 pm
आटपाडीः आता शेवटच्या टप्प्यात विरोधक येतील आणि देतील. मी चहा बिस्कीट म्हणत आहे. गैरसमज करून घेऊ नका. ते तुम्ही दोन्ही हाताने घ्या. ते जे देतात ते त्यांचे नाही तुमचेच आहेत. मी पण तुमच्या मनात जे आहे ते करा. कारण पन्नास खोके इज नॉट ओके. हे गलिच्छ राजकारण दुर्देवी आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधला.
आटपाडी येथे खानापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वैभव सदाशिव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत त्या बोलत होत्या. बाबासाहेब मुळीक, हणमंतराव देशमुख, विष्णुपंत चव्हाण, प्रभाकर नांगरे, अनिता पाटील, सूरज पाटील, कविता म्हेत्रे व मान्यवर उपस्थित होते.
त्या म्हणाल्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री लोकांना लाथ मारून जातात. राजश्री शाहूंच्या भूमितीतील खासदार धनंजय महाडिक महिलांच्या बाबत चुकीचे भाषा वापरतात. त्या त्याच्या संगतीचा परिणाम आहे, ते आधी चांगले होते असा टोला लगावला.
लोकसभेनंतर लाडकी बहीण झाली आहे. पण या सरकारला नात्याची किंमत कळली नाही. नात्याला एवढी पंधराशे किंमत दिली. माझ्यावर टीका करतात. हो माझा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला. माझ्या हातात सहा बांगड्या माझ्या आईच्या आहेत आणि त्या शेतीतील कष्टाच्या आहेत. माझा सोन्याचा चमचा हा आहे, भाऊ बहिणीचे पावित्र्य वेगळं असतं. भावानी मागितलं असतं आम्ही सर्व दिलं असतं. गठुळ घेऊन गेलो नसतो असा नांव न घेता सुप्रिया सुळे या बांगडया ईडी -सीबीआयच्या नाहीत असं म्हणाल्या. लाडकी बहीण आहेच. पण ती महालक्ष्मी आहे आणि या महालक्ष्मीला आम्ही तीन हजार तिला देऊ असेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या स्वच्छ सुंदर गांव हे आबांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे.राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार वैभव पाटील यांच्या पाठीशी आहे.विकासाची दृष्टी असलेल्या वैभव पाटील यांना परिवर्तन घडवण्यासाठी निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
चार नंबरच्या आकड्याचा योगायोग
पुढे त्या म्हणाल्या की खानापूर 4, आटपाडी 4, विसापूर 4... आणि वैभव पाटील यांचा नंबरही 4. त्यामुळे विजय निश्चित आहे. दूध, सोयाबीनला योग्य भाव भेटत नाही. या सरकारने बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढवून ठेवलाय असे सांगत महाविकास आघाडी येताच महाभारती आणि हमीभाव देण्याची ग्वाही खासदार सुळे यांनी यावेळी दिली.