करमाळा येथील हेलिपॅडवर शरद पवार यांच्या बॅगेची तपासणी करताना निवडणूक आयोगाचे कर्मचारीPudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 1:59 pm
Updated on
:
17 Nov 2024, 1:59 pm
करमाळा : बारामती पाठोपाठ करमाळयातही शरद पवार यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. शरद पवार यांची आज करमाळयात माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती.
आज सकाळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात उभे केलेल्या हेलीपॅडवर शरद पवार यांचे हेलिकॉप्टर उतरले. हेलिकॉप्टरमधून शरद पवार बाहेर पडताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी सुरु केली. त्यांच्यासोबतच्या बॅगेची कसून तपासणी केली मात्र यामध्ये त्यांना काहीच आढळून आले नाही.
यावेळी पवार यांनी या तपासणीकडे दुर्लक्ष करत त्यांना तपासणी करू दिली. त्यादरम्यान ते उपस्थित असलेल्या वाहनातून ते थेट महात्मा गांधी विद्यालयाच्या सभेच्या ठिकाणी आले. यावेळी आजच बारामती येथे त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आल्याचे वृत्त असतानाच पुन्हा बारामतीनंतर करमाळ्यात सलग दुसऱ्यांदा त्यांच्या बॅगेची तपासणी झाल्याने यावेळी उपस्थितांमध्ये कुजबुज सुरु होती.