चार दिवसात तीन रोहीत्र खराब:शेतकऱ्यांची पिके धोक्यात अचलपुर तालुक्यात संबंधित विभागाचे दुर्लक्ष

2 hours ago 1
रोहीत्र सतत खराब होत असल्याने अचलपूर तालुक्यातील सावळी (बु.||) येथील बहुतांश शेतकऱ्यांची सिंचनाखाली असलेली पिके धोक्यात आली आहे. दरम्यान वारंवार तक्रारी करुनही महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा या भागातील नागरिक विशेषत: शेतकऱ्यांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी असदपूर विद्युत्त उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सावळी बु येथील दिनकरराव गावंडे यांच्या शेतातील विद्युत्त रोहीत्र नादुरुस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अभियंत्यांना माहिती देत हे रोहीत्र दुरुस्त करण्याची मागणी केली. विद्युत्त विभागाने हे खराब झालेले रोहीत्र दुरुस्तीसाठी २० ते २५ दिवसाचा कालावधी लावला. त्यानंतर नव्याने लावलेले रोहीत्र पुन्हा नादुरुस्त झाले अशा प्रकारे तीनवेळा रोहीत्र नव्याने बसवूनसुध्दा शेतकऱ्यांची समस्या मात्र निकाली निघाली नाही. विद्युत्त विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत्त रोहीत्र दुरुस्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात घोळ असल्याची बाब नाकारता येत नाही. नवीन आणलेले रोहीत्र एकदा नव्हे तीनदा नादुरुस्त होणे, ही बाब यात मोठा घोळ असल्याचे स्पष्ट करत आहे. एकीकडे पॉवर ऑन व्हील ही संकल्पना महावितरण कंपनीकडून राबविल्या जात असताना शेतकऱ्यांना मात्र रोहीत्र दुरुस्ती अभावी पाण्याविना पिकाचे नुकसान होत आहे. सध्या शेतात हरभरा, गहू व संत्र्याला पाणी देण्यासाठी शेतात कृषी पंप सुरु ठेवणे आवश्यक आहे. मात्र मुळातच नवीन रोहीत्र दर्जाहीन असल्याने त्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सावळी बु. येथील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रोहीत्र दुरुस्तीच्या नावावर शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबविणे गरजेचे आहे. असदपूर येथील अभियंत्यानी विद्युत्त रोहीत्र दुरुस्तीसाठी योग्य ती दखल घेतली तरी वरिष्ठ कार्यालयाकडून विद्युत्त रोहीत्र पुरवठया दरम्यान होत असलेल्या घोळाची चौकशी करणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तीनवेळा दुरुस्ती तरीही दोष कायमच सावळी बु. येथील दिनकरराव गावंडे यांच्या शेतावर असलेल्या रोहीत्र जळल्यानंतर २० ते २५ दिवस ते दुरुस्त झाले नाही. शिवाय एकदा दुरुस्त केल्यानेही भागले नाही. त्यामुळे दोनवेळा नव्याने पाठविण्यात आले. अशाप्रकारे तीनवेळा दुरुस्ती केली गेली. पण तिसरे रोहीत्रही बंदच पडले. अशाप्रकारे तीन रोहित्र खराब झाल्याने शेतकऱ्यांनी सिंचन कसे करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article