Published on
:
17 Nov 2024, 3:56 pm
Updated on
:
17 Nov 2024, 3:56 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्यासमोर आदानी नावाचं सुलतानी संकट असून संपूर्ण मुंबई बिल्डरांच्या घशात घालण्याचं षडयंत्र सत्ताधारी सरकारचं सुरू आहे. ही मुंबई आमच्या हक्काची असून ती कोणाच्याही घशात मी जाऊन देणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.१७) दिला. तसेच आमचे सरकार आल्यानंतर आदानीला काम देण्याचे आदेश मी फाडून टाकणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसीमध्ये सभेदरम्यान ते बोलत होते.
संपूर्ण महाराष्टात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. बेकारी वाढत आहे. तुम्ही हे सरकार बदला मी तुम्हाला सोयाबीनला ७ हजार भाव देतो, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. तुम्ही फक्त सरकार बदला सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.