व्होट जिहादसारखे विषय जाणीवपूर्वक समोर आणतात:सचिन पायलट यांचा भाजपवर गंभीर आरोप
2 hours ago
1
व्होट जिहाद किंवा व्होट धर्मयुद्ध असे विषय भाजप जाणीवपूर्वक समोर आणत आहे. सत्ताधारी पक्ष प्रथमच विरोधी पक्षावर आरोप करत आहे. भाजपने इलेकट्रोल बॉण्ड मध्ये मोठा घोटाळा केला आहे ही बाब सर्वाच्च न्यायालयात देखील स्पष्ट झाली आहे, असे मत काँग्रेसचे राजस्थान मधील नेते सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहंमद , काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, सौरभ अमराळे, मुख्तार शेख उपस्थित होते. पायलट म्हणाले, महाराष्ट्र मधील विधानसभा निवडणुक ही देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत मतदार यांनी आघाडी सरकारला साथ दिली आहे. भाजपचा ४०० पार नारा भ्रम मतदारांनी उद्ध्वस्त केला. महाराष्ट्र मध्ये सिंचन योजना, शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी याबाबत चर्चा झाली पाहिजे. उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याठिकाणी येऊन चुकीच्या घोषणा देतात ही बाब त्यांचा पदाला शोभा देत नाही. पायलट पुढे म्हणाले, दर निवडणुकीत भाजप पाकिस्तान विरोधात आणि धार्मिक मुद्दे समोर करत आहे. सोयाबीन, कापूस , कांदा यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मध्ये प्रचंड नाराजी आहे. गॅस सिलेंडर भाव वाढले असल्याने लोकांचे जीवन कठीण झाले आहे. मुख्य प्रश्नावरून लक्ष्य विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे भाजप वारंवार पुढे करत आहे. चीन आज देशात घुसखोरी करत असून भाजपचे देशप्रेम उघड पडले आहे. काँग्रेस पक्ष देशात सर्वांना सोबत घेऊन काम करते आणि आपल्या विचारापासून कधी दूर जात नाही. जनतेला पारदर्शी सरकार हवे आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)