व्हिटॅमिन डीची कमतरता बऱ्याचदा हिवाळ्यात लोकांमध्ये दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे सूर्यप्रकाशाचा अभाव आणि या दिवसांमध्ये लोकं जास्त वेळ घरात घालवतात. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, कारण ते हाडे मजबूत करण्यास, चयापचय सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हिवाळ्यात जेव्हा सूर्याची किरणे कमकुवत असतात तेव्हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डीसाठी सूर्याची किरणे मिळण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान आहे. हिवाळ्यात सूर्याची किरणे अधिक सौम्य असतात, त्यामुळे सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढण्यास मदत मिळते. कारण हिवाळ्यात सूर्याचा कल कमी असतो, त्यामुळे जास्तीत जास्त वेळ उन्हात राहणे फायदेशीर ठरू शकते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची इतर कारणे
बराच वेळ घरातच राहा.
सनस्क्रीनचा वापर करणे.
हाडांच्या आरोग्यावर परिणाम होणे.
व्हिटॅमिन डीचे इतर स्त्रोत
हिवाळ्यात व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकता:
रावस मासा, तारली मासा आणि बांगडा या सारखे माश्यांचे सेवन करा.
अंड्यातील पिवळ बलक याचे सेवन करावे.
व्हिटॅमिन डी समृद्ध धान्ये आणि फोर्टिफाइड पदार्थ सेवन करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)