हैदराबाद-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्‍यू

2 hours ago 1

हैदराबाद-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्‍यूFile Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

07 Oct 2024, 7:52 am

Updated on

07 Oct 2024, 7:52 am

अणदूर, पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ६५) वरील तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे आज (सोमवार) (दि.७) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हॅलो मेडिकल फाउंडेशनजवळ कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. गाडी नवीन असल्याने गाडीवरती कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसून गाडीमध्ये मद्यप्राशन केल्याल्या बाटल्या मिळाल्‍या आहेत. त्यामुळे येथे जमलेल्‍या नागरिकांनी संताप व्यक्‍त केला.

नवरात्रोस्‍तव चालू असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक चिवरी महालक्ष्मी दर्शनाला येतात. नवरात्रीची पाचवी माळ असल्याने धनगरवाडी येथून चिवरी महालक्ष्मी दर्शनासाठी जात असताना कारने जोराची धडक दिल्याने राहुल गोरख दुधभाते (वय २८) हे जखमी झाले तर त्‍यांची पत्नी प्रियांका राहुल दुधभाते (वय २४) यांचे या अपघातात निधन झाले. प्रियांका व राहुल यांचा विवाह होईन केवळ दोन वर्षे झाली आहेत. या अपघातात प्रियांका यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

गाडीमध्ये मद्याच्या बाटल्‍या

अपघातस्थळी गाडीमध्ये मद्य असल्याच्या बाटली दिसून आल्याने चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत होता का.? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने कारच्या धडकेत गाडी १०० फूटापर्यंत दुचाकी गाडीला फरफटत नेले. यावेळी दुचाकीवरील दोघेजणही फरफटत गेले. या राष्ट्रीय महामार्गावरती सातत्याने अपघाताचे सत्र सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग पोलीस प्रशासन यांनी मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवरती कारवाई करणे गरजेचे असल्‍याची भावना नागरिकांनी व्यक्‍त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article