12 हजार मेगावॅटची कामे झाली:5 वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकाेटमध्ये भूमिपूजन‎

2 hours ago 1
आपले सरकार काम करणारे, विकास करणारे आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली. पुढच्या पाच वर्षांपर्तंत विजेचे बिल घेणार नाही. १२ हजार मेगावॅटची कामे झाली आहेत. दिवसभर शेतकऱ्यांना वीज मिळेल. सौर कृषी पंप योजनेत फक्त १० टक्के रक्कम भरून २५ वर्षे वीजबिल येणार नाही. पाच वर्षांपर्यंत विमा काढलेला आहे. योजना आपल्या सरकारने आणली आहे. किसान सन्मान योजना, नमो किसान योजना आहेत, याद्वारे शेतकऱ्यांचा विकास केला जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील फत्तेसिंह मैदानावार विविध विकासकामांचे भूमिपूजन व उजनीच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यअहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हाणाले, अक्कलकोट हा शेवटचा तालुका म्हणून आतापर्यंत दुर्लक्षिला गेला. विरोधक निवडणुका आल्या की आश्वासने देतात. पण पाणी काही आले नव्हते. आम्ही पाणीही आणले, जलपूजनही केले. जलवाहिनी, रस्त्याची कामे, उपजिल्हा रुग्णालय, अमृत दोन पाणीपुरवठा, देगाव एक्स्प्रेस कॅनॉल सुरुवात आदी विकासकामे केली. सचिन नावाचा हीरा तुमच्यामुळे विधानसभेत पोहोचला. एखादा आमदार कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन कल्याणशेट्टी. उमेदवारी दिल्यानंतर त्या त्या मागण्या, आश्वासने पाठपुरावा करून मान्य करून घेतल्या. तुमच्या कल्याणासाठी तुमचे आशीर्वाद सदैव कल्याणशेट्टी व आमच्या सोबत असू द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एकरूख योजना २७ वर्षे बंद पडली हीती. ती योजना सुरू होण्यासाठी ४१२ कोटी सुप्रमाच्या माध्यमातून दिले. हे सर्व कामे सचिनच्या मेहनतीतून झाले आहे. तालुक्यातील मंदिर संस्थांना भरीव निधी दिला व जीर्णोधार केला. काँग्रेस लाडक्या बहिणीसाठी सावत्र भाऊ ठरत असून, या योजनेतून पैशांचा चुराडा आहे, अशी केस टाकून या योजना बंद करण्याचा घाट काँग्रेसने घातला आहे. पण तुम्ही सोबत असताना कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, जे जे मतदारसंघासाठी मागितले ते ते दिले आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला आहे. आधी अक्कलकोटसाठी पाणी हे नेहमी मृगजळ ठरले होते. एकरुख उपसा सिंचनसाठी ४१२ कोटी सुप्रमाच्या माध्यमातून दिले व उजनीचे पाणी कुरनूर धरणात आले. आधी फक्त रस्ते १५० किमी रस्ते होती. आता अडीच वर्षात ५२० किमी चकचकीत रस्ते झाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article