30 तारखेपर्यंत मुख्यमंत्री निश्चित अन् डिसेंबरमध्ये शपथविधी:रावसाहेब दानवे; एकनाथ शिंदे नाराज नसल्याचाही केला दावा
2 hours ago
1
महायुतीच्या मुख्यमंत्री पदासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत नाव निश्चित होईल आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये शपथविधी होईल, असे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी एकट्याची नाही. यावर तिनही पक्षांचे नेते चर्चा करतील, असे दानवे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नसल्याचेही दानवे म्हणाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटले आहेत. निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून मुख्यमंत्री कोण होणार यावर निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. या सर्व घडामोडींवर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केले आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, मुख्यमंत्रीपद आणि शपथविधीचे घोडे कुठेही अडलेले नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा गटनेता निवडला गेला. लवकरच भाजपचा गटनेता निवडला जाईल. यानंतर तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून पक्षश्रेष्ठींकडे आमदारांचे म्हणणे मांडतील , ते देतील तो निर्णय मान्य असेल. मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी एकट्याची नाही मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना दानवे म्हणाले, भाजपसह इतर पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये, अशी प्रत्येक पक्षाची भावना असते. त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. परंतु, सगळेजण एकत्र बसून चर्चा करत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी एकट्याची नाही, यावर सामूहिक चर्चा होईल. 30 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव निश्चित होईल आणि डिसेंबरमध्ये शपथविधी होईल. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या फक्त चर्चा एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. ते नाराज असल्याच्या फक्त चर्चा आहेत. तसेच मुख्यमंत्रीपदाचा आणि मंत्रिपदाचा फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. हे ही वाचा... मुख्यमंत्री पदावरून शिंदे-फडणवीसांमध्ये दुरावा?:अजित पवारांचा राजभवनात टायमिंग साधत दोघांमध्ये दिलजमाईचा प्रयत्न मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी दोघांमध्ये समिट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनात आले असता अजित पवार यांनी टायमिंग साधत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. पूर्ण बातमी वाचा... अजित पवारांचे CM पदाचे स्वप्न पूर्ण होणार?:भाजप राज्यात धक्कातंत्र वापरण्याची शक्यता; मुख्यमंत्रीपदासाठी 3 फॉर्म्युल्यांवर गंभीर चर्चा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. पण निकालाला 3 दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपल्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यात यश आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. या प्रकरणी 3 फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे. त्यात फडणवीस यांना तूर्त थांबण्याचे निर्देश दिले जातील. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. पूर्ण बातमी वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)