पुण्यातील संचेती रुग्णालयात रुग्ण सुरक्षेसाठी पुण्यातील पहिला स्मार्ट वाॅर्ड उपक्रम:दोन आयआयटीएन्सने एआय आधारित 'डोझी' ही अत्याधुनिक सुविधा केली निर्माण

2 hours ago 1
पुण्यातील संचेती रुग्णालयात रुग्ण सुरक्षेसाठी पुण्यातील पहिला स्मार्ट वाॅर्ड उपक्रम - डाॅ.पराग संचेती पुणे, प्रतिनिधी - रुग्ण रुग्णालयात दाखल असताना त्यांची अतिदक्षता विभागात चांगल्याप्रकारे काळजी घेतली जाते परंतु तेच रुग्ण आयसीयू साेडून इतर ठिकाणी दाखल असताना त्यांची काळजी त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक हे सातत्याने घेत असतात मात्र, रुग्ण अत्यावस्थ हाेताना त्याची माहिती वेळीच डाॅक्टरांना समजणे आवश्यक असते. रुग्णालयात प्रत्येक रुग्णाकडे लक्ष्य ठेवणे डाॅक्टर किंवा नर्स यांना शक्य नसते त्यामुळे आता रुग्णांची सुरक्षा करण्यासाठी मुंबईतील दाेन आयआयटीएन्सने एआय आधारित रिमाेट माॅनिटरींग सिस्टीम (आयएमएस) व अर्ली वाॅर्निंग सिस्टीम (ईडब्ल्यूएस)च्या सहाय्याने ‘डाेझी’ ही अत्याधुनिक सुविधा निर्माण केली आहे. त्याच्या सहाय्याने सुधारित रुग्ण सुरक्षेसाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात रुग्ण सुरक्षेसाठी पुण्यातील पहिला स्मार्ट वाॅर्ड उपक्रम सुरु करण्यात येत असल्याची माहिती संचेती ग्रुप ऑफ हाॅस्पिटलचे अध्यक्ष डाॅ.पराग संचेती यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डाॅ.आदिती मालपानी, डाॅ.पी.एस.गरचा, काैशल पांडया, डाॅ.यशवंत शिवण्णा उपस्थित हाेते. डाॅ.संचेती म्हणाले, डाेझीची अद्यावयत माॅनिटरिंग सिस्टिम ही रुग्णालयाचे आराेग्य सेवेत एक परिवर्तनीय पाऊल आहे. रुग्णांसाठी अधिक चांगले परिणाम मिळविण्यासाठी डाटाचलित तंत्रज्ञान, प्रतिक्रियात्मक वैद्यकीय सेवांपासून प्रतिबंधात्मक व सक्रीय आराेग्य सेवा उपलब्ध हाेणार आहे. या स्मार्ट वाॅर्ड उपक्रम अंर्तगत बिगर आयसीयू बेडस ठिकाणी अत्याधुनिक रिमाेट पेशंटस माॅनटरिंग सिसिटीम्स युक्त हाेतील. ज्यामुळे महत्वाच्या वैद्यकीय निकषांवर देखरेख ठेऊन गरज पडल्यास याेग्य वैद्यकीय सेवा रुग्णांना वेळेत दिली जाईल. डाेझीच्या सहाय्याने आराेग्य सेवा कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या बेड खाली एक इलेक्ट्रिक सेन्साॅर पट्टी ठेऊन रुग्णाचे हद्याचे ठाेके, रक्तदाब, एसपीओ २ पातळी, तापमान, ईसीजी यासारख्या महत्वाच्या वैद्यकीय बाबीवर देकरेख ठेवता येईल. अर्ली वाॅर्निंग सिस्टीम आधारे १६ तास आधीपर्यंत रुग्णाची तब्येत बिघडण्याचा अंदाज लावता येऊ शकताे व त्यानुसार उपचार देता येतील. रुग्णाच्या वैद्यकीय परिस्थितीत बिघाड झाल्यास आराेग्यसेवा कर्मचाऱ्यांना माेबाईलवरच तातडीने सूचना मिळून याेग्य वेळेत गरजेनुसार हस्तक्षेप करता येईल. एआय आधारित बॅलिस्टाेकार्डिओग्राफी (बीसीजी) चा वापर करुन काॅन्टॅक्टलेस माॅनिटरिंग करणे शक्य हाेते. अभिनव तंत्रज्ञानाचा रुग्ण सुरक्षिततेवर, वैद्यकीय परिणामांवर आणि कामकाजाच्या कार्यक्षमतेवर लक्षणीय सकारात्मक प्रभाव पडताे. यामुळे रुग्णांवर सतत देखरेख व याेग्य वेळेत उपचार करणे शक्य हाेणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article