Multibagger Refex Industries Ltd Share: गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. परंतु काही शेअरमधील तेजी कायम आहे. घसरणाऱ्या बाजारातही हे शेअर चांगला नफा देत आहे. त्यातील एक शेअर मल्टीबैगर बनला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना छप्पर फाड रिटर्न दिले आहे. ज्याने या शेअरमध्ये 50 हजार रुपये गुंतवले असतील त्याचे आता एक कोटींपेक्षा जास्त रुपये झाले आहे. या शेअरचे नाव Refex Industries Ltd आहे. वर्षभरातच 110 रुपयांवरुन 600 रुपयांवर हा शेअर गेला होता. सध्या घसरणीनंतर हा शेअर 444 रुपयांवर आला आहे. दहा वर्षांत या शेअरने 22,100% रिटर्न दिले आहे.
6 महिन्यात 50% पेक्षा जास्त रिटर्न
Refex Industries Ltd हा शेअर मागील काही दिवसांपासून घसरण आणि उच्चांक गाठत आहे. मागील एका महिन्यात या शेअरमधून 11 टक्के रिटर्न दिले आहे. सहा महिन्यांतच यामधून 50 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहे. वर्षभरात या शेअरने नवीन उच्चांक निर्माण केला आहे. वर्षभरात तीन पट फायदा या शेअरने गुंतवणूकदारांना दिला. वर्षभरात या शेअरमध्ये ज्याने एक लाख रुपये गुंतवले त्याचे आता तीन लाख रुपये झाले आहेत.
असे बनवले करोडपती
Refex Industries Ltd या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. दहा वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ दोन रुपये होती. या दहा वर्षांत या शेअरने 22,100 टक्के रिटर्न दिले. दहा वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीत 50 हजार रुपये गुंतवले असतील तर त्याची किंमत आता एक कोटीपेक्षा जास्त म्हणजे 1.10 कोटी रुपये झाले आहेत. यामुळे शेअरमधील केलेली गुंतवणूक अनेक गुंतवणूकदारांना करोडपती बनवली आहे.
हे सुद्धा वाचा
डिस्क्लेमर: या विश्लेषणामध्ये दिलेल्या शिफारसी वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांच्या आहेत. आम्ही गुंतवणूकदारांना कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा सल्ला देतो. कारण शेअर बाजाराची परिस्थिती झपाट्याने बदलू शकते.