57 एकर क्षेत्रावर उत्पादनक्षम वाणांवर मार्गदर्शन:पैलपाडा येथे राज्यभरातील शेतकऱ्यांनी जाणून घेतली माहिती
3 hours ago
1
‘महाबीज’च्या पैलपाडा येथील उत्कृष्टता केंद्रावर ४ फेब्रुवारीपर्यंत शिवारफेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीत गव्हाचे अधिक उत्पादनशील ३३ वाण व हरभऱ्याच्या ३८ वाणांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. राज्यभरातून शेतकरी बांधव या फेरीत सहभागी होत आहेत. ‘महाबीज’चे पैलपाडा येथे ५७ एकरांचे प्रक्षेत्र आहे. गव्हाच्या ३३ व हरभऱ्याच्या ३८ वाणांची माहिती, तसेच संकरित ज्वारी, मका, जवस, बाजरी, सूर्यफुल आदी पिके व ‘महाबीज’ संशोधित नव्या भाजीपाला वाणांचा शिवारफेरीत समावेश आहे. रब्बी व उन्हाळी पीकांच्या विविध वाणांचे गुणधर्म शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अनुभवता यावे व त्यानुरूप त्यांच्या जमिनीला अनुकूल वाणांची निवड करता यावी, हा शिवारफेरीचा उद्देश आहे. शिवारफेरीत पहिल्या दिवशी जळगाव, जालना, पुणे येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ४ फेब्रुवारीला परभणी व नागपूर विभागातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता होणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कुंभेजकर यांनी केले. देशमुख, डॉ. सपकाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. बीजपरीक्षण अधिकारी राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा व्यवस्थापक गणेश डहाळे यांनी आभार मानले. ‘महाबीज’च्या शिवारफेरीत सहभागी शेतकऱ्यांसमवेत पाहणी करताना अधिकारी वर्ग शेतकरीभिमुख उपक्रम राबवणार : कुंभेजकर फेरीचा शुभारंभ ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते मंगळवारी झाला. संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजीत सपकाळ, महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने, भागधारक, शेतकरी उपस्थित होते. उत्पादनक्षम बियाणे संशोधन व शेतकरीभिमुख उपक्रम राबवण्यात येतील, अशी ग्वाही कुंभेजकर यांनी यावेळी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)