नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातील सर्व पुरावे देणार:भगवानगडाने बाजू घेतल्यानंतर अंजली दमानियांनी व्यक्त केले दुःख
3 hours ago
2
धनंजय मुंडे यांच्या बद्दल जे-जे आक्षेप घेतले जात आहेत. जे-जे पुरावे बाहेर येत आहेत. ते खरेच सत्य आहे, ही बाजू कदाचित नामदेव शास्त्री यांना माहीत नसावी. कदाचित त्यांना सर्व पुरावे दाखवले तर त्यांचा विश्वास बसेल. असे मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात आपण नावदेव शास्त्री यांच्यापर्यंत पुरावे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे. त्यांचे वक्तव्य ऐकले असून त्यामुळे आपल्याला दुःख झाले अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. भगवानगडाचे महंत नावदेव शात्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेत, ते 100 टक्के दोषी नसल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर यामुळे जातीवाद बळावला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे देखील शास्त्री यांनी म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी हे वक्तव्य केले आहे. या आधी धनंजय मुंडे भगवानगडावर कधी राहायला गेले होते? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना विचारला आहे. धनंजय मुंडे यांनी जे-जे नामदेव शास्त्री यांना सांगितले असेल, त्यावर त्यांचा विश्वास बसला असेल. माझ्यावर अन्याय होतोय, पुराव्यात काहीही तथ्य नाही, असे नामदेव शास्त्री यांच्यासमोर मुंडे यांनी मांडले असेल. त्यानुसार नामदेव शास्त्री बोलले असतील. मात्र जे जे सत्य आहे, ते-ते पुराव्यानिशी आम्ही बोलत असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केला आहे. या संदर्भात अंजली दमानिया म्हणाल्या की, संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती अत्यंत क्रूर, निर्घुण आणि किसळवाणी होती. ती माणुसकीला काळीमा फासणारी होती. त्यामुळे त्याबद्दल न बोलणे बरे. मी फारच छोटी व्यक्ती आहे. नामदेव शास्त्री अतिशय विचारवंत आणि विद्वान व्यक्ती आहेत. मात्र त्यांनी केलेले वक्तव्य ऐकून मला दुःख झाले, एवढेच मी म्हणू शकते, असे देखील अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. सर्व कागदपत्रे पाठवणार मी सर्व कागदपत्र घेऊन अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. अजित पवार हे सर्व कागदपत्र बघून अतिशय गंभीर झाले होते. त्यांनी प्रत्येक कागद बघितला. एकदाच नाही तर अनेक बैठका या धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या एकत्र झाल्या आहेत. ज्या कंपनीमध्ये राखेचे पैसे आले, त्या कंपनीतून आर्थिक फायदा देखील धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. ही सर्व कागदपत्रे मी अजित पवार यांना दाखवली आहेत. त्या पैशातून जमिनी घेतल्या गेल्या, हे सर्व अजित पवार यांना देखील माहित नव्हते. त्यामुळे नामदेव शास्त्री यांना देखील ही माहिती नसावी. जर पक्षातील सोबत काम करणाऱ्या लोकांना देखील माहित नव्हते. तर नामदेव शास्त्री यांना देखील ते माहिती नसावे. त्यामुळे आता ही सर्व कागदपत्रे मी नामदेव शास्त्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. नेमके काय म्हणाले हाते नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांची मानसिक स्थिती मी जाणून घेतली असल्याचा दावा नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईन लावलेली असल्याचा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे. धनंजय मुंडे गुन्हेगार व्यक्ती नाहीत. त्यांची पार्श्वभूमी देखील तशी नाही. तो एक राजकीय घराण्यातील व्यक्ती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्यातील व्यक्ती आहे. ते खंडणी घेऊन जगणारे व्यक्ती नसल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते शंभर टक्के गुन्हेगार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असे देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत याची पक्षातील नेत्यांना देखील जाणीव आहे, असा दावा देखील नामदेव शास्त्री यांनी केला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)