7 संघातील 147 धनुर्धर झुंजले विभागीय जेतेपदासाठी:विजेत्यांचा नांदेड येथील राज्यस्तरीय स्पर्धेत लागणार कस

3 days ago 2
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती तसेच अमरावती जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने नुकत्याच घेण्यात आलेल्या विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत पाचही जिल्ह्यातील धनुर्धर जेतेपदासाठी झुंजले. जिल्हा क्रीडा संकुल तपोवन अमरावती येथील खेलो इंडियाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्चरी रेंजवर झालेल्या स्पर्धेत पाचही जिल्ह्यातील १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटात झालेल्या या स्पर्धेत इंडियन, कंपाऊंड व रिकर्व्ह या तिन्ही प्रकारांमध्ये खेळाडूंनी एकमेकांना तुल्यबळ लढत दिली. या स्पर्धेत अमरावती विभागातील अमरावती ग्रामीण, अमरावती मनपा, बुलडाणा, यवतमाळ, अकोला ग्रामीण, अकोला मनपा व वाशीम येथील १४७ धनुर्धर सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उदघाटक म्हणून प्रमुख पाहुणे महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांच्या हस्ते व विभागीय क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी संजय पांडे, साई प्रशिक्षक प्रवीण शर्मा, भारतीय धनुर्विद्या प्रशिक्षक चंद्रकांत ईगल, राज्य क्रीडा मार्गदर्शक व स्पर्धा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या उपस्थितीत झाले. तिन्ही धनुर्विद्या प्रकारात स्पर्धेचे पंच म्हणून स्वाती बाळापुरे, गणेश विश्वकर्मा, अमर जाधव, गिरीश कुकडे, अनिल थडकर, स्वप्निल भुयार, पवन तांबट, विकास वानखडे, विलास मारोटकर, शुभम नागे यांनी कामगिरी बघितली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article