Akola : अकोल्यात ‘जीबीएस’चा शिरकाव; सर्वोपचारात ५ रुग्ण !

2 hours ago 1

Akola:- अकोला राज्यात सर्वप्रथम पुण्यात आढळून आलेल्या GBS अर्थात ‘गुइलेन खैरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आता अकोल्यातही पोहोचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Government Medical Colleges) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात जीबी सिंड्रोमच्या ५ रुग्णांवर उपचार सुरूअसून यातील एका रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. GB सिंड्रोमच्या पाच रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

एकाची प्रकृती गंभीर, घाबरू नका, सतर्क राहा आरोग्य यंत्रणा सतर्क

या आजाराच्या पृष्ठभुमीवर अकोल्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आजार कोरोनासारखा (Corona) संसर्गजन्य नाही, त्यामुळे नागरिकांनी धावरून जाऊ नये तर खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने (Department of Health) केले आहे. जीवीएस’ आजारासाठी वापरण्यात येणारी औषधे अतिशय महाग असून रुग्णाला है औषध मोक्या प्रमाणात द्यावे लागते. त्यामुळे प्राधिकरण, डीएचएस आणि डीपीसीकडून औषधे खरेदी करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेले जीवीएस रुग्ण अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असून यातील रुग्ण खासगी रुग्णालयातून सर्वोपचारमध्ये ‘रेफर झालेले आहेत.

पाच राखणांपैकी एक रुग्ण सहा महिन्यांपासून भरती

उपचार घेत असलेले पाच राखणांपैकी एक रुग्ण सहा महिन्यांपासून भरती असून त्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यावर उपचार सुरू आहे अन्य चार रुग्णांची प्रकृती स्थीर अपाल्याची माहिती रुग्णालय सुत्रांनी दिली. जीवीएस आजार संसर्गजन्य नसल्याने या रुग्णावर सर्वोपचारच्या मेडीसीन वार्डात उपचार सुरू आहे. जिल्ह्यात गुईलेन खैरे सिड्रोम या आजाराचे साण आवळून आलेले आहेत, या पृष्ठभुमीवर अकोला जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प. सीईओ बी. वैष्णवी, आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याकडून नियोजन करण्यात येत आहे. मुईलेन बॅरे सिंड्रोम (Moulin Barre syndrome)  हा एक दुर्मिळ स्वयंप्रतिकार रोग आहे, रोगप्रतिकारक शशक्ती मज्जातंतूवर हल्लाकरते.

पाणी उकळून प्यावे अन्न स्वच्छ आणि ताजे खावे

गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे पायांमध्ये अशक्तपणा किंवा मुंग्या येणे या संवेदना आहेत, ज्यानंतर शरीराच्या वरच्या भागात आणि हातापर्य जाऊ शकतात. हालचाल करण्यात अडचण असे चालणे किंवा डोळे किंवा चेहरा हलविणे, वेदना, मूत्राशय किंवा आतडे नियंत्रित करण्यात अडचण, वेगवान हृदयगती, कमी लिंकंवा उच्च रक्तदाङ, श्वास घेण्यास किंवा गिळण्यास अडचण, अंधुक दृष्टी. हा आजार सहसा व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या (Bacteria) संसर्गानंतर सुरू होतो. नागरिकांनी पिण्याचे पाणी दुषित होणार नाही याची दक्षता घेणे. पाणी उकळून प्यावे अन्न स्वच्छ आणि ताजे खावे. वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, शिजवलेले आणि न शिजवलेले अन एकत्र ठेऊ नये. न शिजवलेले अनु खाऊ नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article