पोलिसांना पाचारण, मतदारांचा खोळंबा
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Assembly Election 2024) : तालुक्यातील मनुबाई येथे दिड तास ईव्हीएम मशीन बंद पडल्याने अनेक मतदारांचा खोळंबा झाला तर अंत्री खेडेकर येथे दोन पक्षातील मतदारांनी मतदान करण्यावरून आपसात वाद केला आणि झालेल्या वादा मध्ये चक्क ईव्हीएम मशीनच फोडली त्यामुळे तात्काळ घटनास्थळी पोलीस ताफा हजर झाला असून कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सि राजा विधानसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रियेला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरूवात झाली. ही (Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती. मात्र त्यातच आता काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला ग्रहण लागले आणि चिखली तालुक्यातील मनुबाई येथे दुपारच्या 3 वाजेच्या दरम्यान अचानक ईव्हीएम मशीन बंद असल्याची घटना घडली आणि मतदारांचा दिडतास खोळंबा झाल्याने मतदारांनी बूथ वरील अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार ठरवून गोंधळ घातला.
तसेच अंत्री खेडेकर येथे साडे चार वाजेच्या दरम्यान मतदारात आपसात मतदान करण्यावरून वाद उफाळला. आणि झालेल्या वादा मध्ये चक्क एकाने ईव्हीएम मशीनच फोडली त्यामुळे गावात तनावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यात मनुबाई येथील बूथ वर (Assembly Election 2024) ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान हे दिड तास उशीर झाल्याणे मतदानासाठी गेलेल्यांचा खोळंबा झाला होता. आणि अंत्री खेडेकर येथे ईव्हीएम मशीन फोडल्याने बराच वेळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते वृत्त लिहेपर्यत पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नव्हती.
याबाबत उवविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले की अंत्री खेडेकर येथे ईव्हीएम मशीन फोडली असेल तर संबंधितावर कडक कार्यवाही करण्यात येईल तसेच मनुबाई बूथ वरील ईव्हीएम मशीन गरम झाल्याने बिघडली होती. आणि ती त्वरित नवीन मशीन बसविण्यात आली असे दैनिक देशोन्नती शी सांगण्यात आले.