महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खराब कामगिरी झाल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय राजकारणात मोदींच्या उदयाची जी मोठी लाट आली होती, त्यालाही फिकं ठरवत यंदा भाजपची त्सुनामी आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा विरोधी पक्षनेते पद राहिल की नाही? याची शाशंकता आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
महाराष्ट्रात २०१४ साली आलेल्या लाटेपेक्षा यंदा आलेली लाट फिकी वाटावी, अशी त्सुनामी यंदी भाजप आणि महायुतीच्या विजयानंतर पाहायला मिळाली. अनेक गोष्टी या निकालामुळे राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडल्यात आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सरकार हे विरोधी पक्षनेत्याविना चालणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खराब कामगिरी झाल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय राजकारणात मोदींच्या उदयाची जी मोठी लाट आली होती, त्यालाही फिकं ठरवत यंदा भाजपची त्सुनामी आली आहे. एक सर्व्हे वगळता इतर कोणत्याही सर्व्हेत महायुती २०० चा आकडा गाठण्याचं भाकित वर्तवलं नव्हतं. तर सत्ताधारी नेत्यांनीच अपक्षांची गरज लागल्यास मदत घेण्याची वक्तव्य केल्यामुळे मुकाबला चुरशीचा मानला जात होता. मात्र महायुतीच्या त्सुनामीत अपक्षच काय महाविकास आघाडीच्या हाती विरोधी पक्ष नेते पद लागेल का? हा प्रश्न निर्माण होण्यासारखा कौल समोर आला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा विरोधी पक्षनेते पद राहिल की नाही? याची शाशंकता आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Nov 24, 2024 11:42 AM