विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानतंर आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार यांची एका मोठ्या पदावर वर्णी लागल्याची मोठी माहिती समोर आली आहे. नुकतेच अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या […]
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानतंर आता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असताना अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार यांची एका मोठ्या पदावर वर्णी लागल्याची मोठी माहिती समोर आली आहे. नुकतेच अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांची सर्व आमदारांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदार उपस्थितीत होते. झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमताने अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड केली आहे.
Published on: Nov 24, 2024 01:51 PM