प्रथमच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अजितदादा पवार गट राष्ट्रवादीच्या घड्याळाने बाजी मारत आमदार खोसकर यांचा एकतर्फी विजय साकारला. दरम्यान, महाविकास आघाडीशी बंडखोरी करत कार्यकर्ते, काँग्रेस व उबाठा शिवसेना गटाच्या आग्रहावरून मैदानात सरसावलेल्या स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवार तथा माजी आमदार निर्मला गावित, मनसेचे उमेदवार तथा माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
आजी - माजी आमदारांसह रिंगणात असलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार लकी जाधव यांना दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. 15 वर्षे इगतपुरी विधानसभा मतदारसंघावर असलेले काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. आमदार खोसकर यांच्या विजयात माजी सभापती ज्ञानेेशर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, उदय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप चौधरी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक संदीप गुळवे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, पीके ग्रुपचे प्रशांत कडू, खरेदी - विक्री संघाचे सभापती बाळा गव्हाणे, वामन खोसकर, माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.