कटेंगे तो बटेंगे नाऱ्यांमुळे मतांचे ध्रुवीकरण:अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांची निकालावर पहिली प्रतिक्रिया

2 hours ago 1
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार कराड येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जशी अपेक्षा होती तसा हा निर्णय नाही, शेवटी लोकांनी दिलेला हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी निवडणुकीच्या निकालावर दिली आहे. पराभव का झाला याची माहिती घेणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि नव्या जोमाने पुन्हा लढावे, असेही शरद पवार म्हणाले. लाडक्या बहीणीवर बोलताना शरद पवार म्हणाले, की ही योजना केवल निवडणुकीसाठी होती. तसेच आम्ही सत्तेत असलो तर ही योजना सुरू राहील. योजना सुरू ठेवायची असेल तर आम्हाला मतदान करा, सत्ता दिली नाही तर योजना बंद करणार असे त्यांनी प्रचार सभेत बोलताना जनतेला व लाडक्या बहिणींना सांगितले होते, त्यामुळे याचा परिणाम निवडणुकीवर झाला, असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, परंतु हवा तसा निकाल समोर आला नाही, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीने जातीचे राजकारण केले असा आरोप केला जात आहे, यावर बोलताना शरद पवारांनी यावर माझ्याकडे संपूर्ण माहिती नसल्याचे उत्तर दिले. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाला लोकांनी मतदान केले. मात्र विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवारांना मोठ्या मतांनी निवडून दिले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, हे असे का झाले यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, अधिकृत माहिती आल्याशिवाय इव्हीएम मशीनवर बोलणार नाही. कटेंगे तो बटेंगे अशा घोषणांमुळे राज्यात धर्माचे ध्रुवीकरण करण्यात आले, असा आरोप शरद पवारांनी महायुतीवर लावला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article