Published on
:
24 Nov 2024, 10:23 am
Updated on
:
24 Nov 2024, 10:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग, आयपीएलचा या हंगामासाठी लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात पाहायला मिळणार आहे. हा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर असे दोन दिवस चालणार आहे. या लिलावात अनेक खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या लिलावात 10 संघ निश्चित होणार आहेत. लिलावात कोणता संघ सर्वोत्कृष्ट ठरेल आणि यावेळी कोण चॅम्पियन ठरेल.
कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत?
आयपीएलच्या दहा संघांकडे 641 कोटी आणि 50 लाख रुपये आहेत. यामध्ये पंजाब किंग्सकडे सर्वाधिक पैसा आहे. या संघाने केवळ 2 अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहेत. त्यामुळे पंजाबकडे सर्वाधिक 110 कोटी 50 लाख रुपये शिल्लक आहेत. यानंतर, आरसीबी 83 कोटी रु., गुजरात टायटन्स- 69 कोटी रु. चेन्नई सुपर किंग्जकडे 55 कोटी, केकेआर 51 कोटी, सनरायझर्स हैदराबादकडे 45 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 45 कोटी आणि राजस्थान रॉयल्सकडे 41 कोटी रुपये आहेत.
लिलावात किती खेळाडूंवर बोली लावली जाईल?
आयपीएल लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती. या नंतर एकूण 574 खेळाडूंची निवड करण्यात आली. अंतिम टप्यामध्ये जोफ्रा आर्चरसह आणखी 3 नावे जोडली गेली, म्हणजे या लिलावात एकूण 577 खेळाडूंना बोली लावायची आहे. मोठी गोष्ट म्हणजे यापैकी 373 किंवा त्याहून अधिक खेळाडूंना निराशेचा सामना करावा लागू शकतो, कारण सर्व फ्रँचायझी मिळून जास्तीत जास्त २०४ खेळाडू खरेदी करू शकतात.