'आयपीएल'मध्‍ये ऋषभ पंत बनला सर्वात महागडा खेळाडू, जाणून घ्‍या IPLमधील महागडे खेळाडू

1 hour ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

24 Nov 2024, 12:39 pm

Updated on

24 Nov 2024, 12:39 pm

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग 'आयपीएल'च्‍या यंदाच्‍या हंगामासाठी लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात सुरु झाला आहे. आजपासून (दि. २४) हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. या लिलावात 10 संघ निश्चित होणार आहेत. आजच्‍या लिलावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. श्रेयस अय्यरला पंजाबने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज आणि यष्‍टीरक्षक ऋषभ पंत याने काही मिनिटांमध्‍ये श्रेयस अय्‍यरला पिछाडीवर टाकत आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू म्‍हणून आपल्‍या नावाची नोंद केली. लखनौ संघाने ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले आहे.

IPL 2025 चे पाच सर्वात महागडे खेळा (आकडे कोटीमध्‍ये)

ऋषभ पंत (२७) लखनौ सुपरजायंट्स, श्रेयस अय्यर (२६.७५) पंजाब किंग्ज, अर्शदीप सिंग (१८) पंजाब किंग्स, युझवेंद्र चहल (१८) पंजाब किंग्ज, जोस बटलर १५.७५ गुजरात टायटन्स

IPL इतिहासातील आजवरचे सर्वात महागडे खेळाडू (आकडे कोटीमध्‍ये)

  • ऋषभ पंत, संघ- लखनौ सुपरजायंट्स (२७)

  • श्रेयस अय्यर, संघ- पंजाब किंग्ज (२६.७५)

  • मिचेल स्टार्क, संघ- कोलकाता नाइट रायडर्स (२४.७५) वर्ष २०२४

  • पॅट कमिन्स, संघ- सनरायझर्स हैदराबाद (२०.५०)२०२४

  • सॅम करन, संघ-पंजाब किंग्स- (१८.५०) वर्ष २०२३

  • कॅमेरून ग्रीन, संघ- मुंबई इंडियन्स (१७.५०) वर्ष २०२३

ऋषभ पंतने काही मिनिटांमध्‍ये श्रेयस अय्यरला टाकले मागे

टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज आणि यष्‍टीरक्षक ऋषभ पंत याने आयपीएलच्‍या लिलावातील बोलीत नवा विक्रम प्रस्‍थापित केला. आजच्‍या लिलावात त्‍याने काही मिनिटांमध्‍ये श्रेयस अय्‍यरला पिछाडीवर टाकत आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू म्‍हणून आपल्‍या नावाची नोंद केली. लखनौ संघाने ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले आहे. श्रेयस अय्‍यरला 26.75 कोटी रुपयांची बोली लागली होती. ऋषभ पंतसाठी लखनौ आणि आरसीबी यांच्यात रस्‍सीखेच सुरु होती. पंत 2 कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. अल्पावधीतच त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेली. ऋषभ पंतला आपल्‍या संघात सहभागी करुन घेण्‍यासाठी हैदराबादही शर्यतीत सामील झाले; पण लखनौ शर्यतीमध्‍ये राहिले. हैदराबादचे मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या टेबलावर बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत १७ कोटींच्या पुढे गेली. लखनौने पंतसाठी 20.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनौने पंतसाठी २७ कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने माघार घेतली. अखेर लखनौने २७ कोटी रुपयांना ऋषभ पंतला आपल्‍या संघात घेतले.

चहल ठरला भारताचा आयपीएलमधील सर्वात महागडा फिरकी गोलंदाज

भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आज चेन्नईने चहलवर बोली लावायला सुरुवात केली; पण गुजरातनेही चहलसाठी उत्सुकता दाखवली. पंजाबनेही चहलला घेण्यासाठी बोली लावली आणि त्याची गुजरातबरोबर रस्‍सीखेच सुरु झाली. त्याचवेळी लखनौनेही उडी घेतली. लखनौ आणि पंजाब यांच्यात चहलसाठी स्‍पर्धा सुरु झाली. पंजाबने चहलसाठी १४ कोटींची बोली लावली तेव्हा आरसीबी आणि हैदराबादनेही लिलावात उडी घेतली. चहलला घेण्यासाठी हैदराबाद आणि पंजाबमध्ये स्पर्धा लागली. अखेर पंजाबने चहलसाठी १८ कोटींची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. अशा प्रकारे चहल आयपीएल लिलावात विकला गेलेला भारताचा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला.

श्रेयस अय्‍यर ठरला आयपीएलमधील दुसरा महागडा खेळाडू

श्रेयस अय्यर, ज्याने KKR ला त्याच्या नेतृत्वाखाली IPL 2024 चे विजेतेपद मिळवून दिले होते. तो आयपीएलच्‍या इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू बनला. पंजाबने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. श्रेयसची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. श्रेयस अय्यरला मिळविण्यासाठी सुरुवातीला दिल्ली आणि कोलकाता यांच्यात जोरदार स्‍पर्धा पाहण्‍यास मिळाली. या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यात श्रेयस आणि केकेआरला मागे घेण्याची स्पर्धा लागली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. आहे अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना अखेर विकत घेतले होते.

अर्शदीप सिंगसाठी तब्‍बल २० कोटींची बोली

टी-२० क्रिकेटमध्‍ये ९६ विकेटपर्यंत मजल मारलेल्‍या अर्शदीप सिंगसाठी मोठी बोली लागली. पंजाब किंग्सने राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड वापरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांना खरेदी केले. अर्शदीपवरची बोली चेन्नई सुपर किंग्जने सुरू केली होती. त्याला मिळवण्यासाठी चेन्‍नई सुपर किंग्‍ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये काही वेळ रस्‍सीखेच होती. राजस्थान आणि गुजरातनेही बोलीत उडी घेतली, पण अखेर सनरायझर्स हैदराबादने १५.७५ कोटींची बोली लावली. हैदराबादची बोली लागताच पंजाबला अर्शदीपसाठी आरटीएम वापरण्याबाबत विचारण्यात आले. पंजाबने आरटीएम कार्ड वापरुन हैदराबादने 18 कोटी रुपयांची ऑफर दिली ज्यासाठी पंजाबने होकार दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article