राम शिंदेंच्या पराभवामागे बारामती अॅग्रोचा पैसा:चूक कबूल करत सुप्रिया ताईंनी औदार्य दाखवावे, अमोल मिटकरींनी साधला निशाणा
2 hours ago
1
राम शिंदे यांच्या विजयाआड बारामती अॅग्रोचा पैसे आणि गुंड आले, अशी टीका त्यांनी रोहित पवारांवर केली. तसेच अजितदादांविराधोत उमेदवार देण्याची चूक कबूल करण्याचे औदार्य सुप्रिया ताईंनी दाखवावे, असेही अमोल मिटकरी म्हणाले. महायुतीच्या यशामध्ये खारी वाटा उचलल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो, असे म्हणत टोला लगावला. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर निशाणा साधला. अजितदादांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे
अजितदादा किंगमेकरच आहे, याच्यात काही शंका राहिली नाही. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष म्हणून सर्वात जास्त स्ट्राईक रेट राष्ट्रवादी पक्षाचा राहिला आहे. अजितदादांसारख्या नेत्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु, तो निर्णय तिनही पक्षांचे नेते एकत्र येऊन घेतील. आमची इच्छा आम्ही व्यक्त केली, असे अमोल मिटकरी म्हणाले. जनतेनी मविआकडे विरोधीपक्ष नेतेपद ठेवले नाही
महाराष्ट्रातील मायबाप जनतेनी आणि विशेषत: लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात इतके यश पाडले की, महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पद शिल्लक ठेवले नाही. याची आम्हाला खंत वाटते. लोकशाही प्रबळ राहण्यासाठी विरोधी पक्ष असला पाहिजे, पण दुर्दैवाने तो पण आज महाराष्ट्रात नाही. काही ठिकाणी झालेला आमचा पराभव वेदनादायी आहे. पण निवडून आलेल्या आमदारांमध्ये आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले. ठाकरे गटाला लगावला टोला
विरोधकांवर टीका करण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही. परंतु, महायुतीच्या यशामध्ये खारी वाटा उचलल्याबद्दल संजय राऊत यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षातील जेवढे प्रवक्ते खालच्या पातळीवर घरसले, त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. सुप्रिया ताईंनी औदार्य दाखवावे
अजित पवारांवर खालच्या पातळीवर टीका करणारे अमोल कोल्हे आज माध्यमांसमोर येऊन लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, अशी धमक का दाखवू शकत नाही? असा सवाल मिटकरी यांनी केला. ती दानत फक्त अजित पवारांमध्ये होती. बारामती लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला. माझ्याकडून चूक झाले हे अजितदादांनी प्रामाणिकपणे कबूल केले. बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात उमेदवार देऊन तुतारी गटाने चूक केली होती, हे कबूल करण्याचे औदार्य सुप्रिया ताईंनी दाखवावे, असे ते म्हणाले. राम शिंदेंच्या पराभवामागे बारामती अॅग्रोचा पैसा
राम शिंदे यांच्या पराभवावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, राम शिंदे यांचा यावेळी निसटता पराभव झाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात ज्या पद्धतीने घमेंडाची भाषा झाली. राम शिंदे यांची लायकी काढण्यात आली. मतदारांनी त्यांना नाकारले होते. मात्र, राम शिंदे यांच्या विजयाच्या आड बारामती अॅग्रोचा पैसा आणि बारामती अॅग्रोतून आणलेले गुंड आले. यामुळे राम शिंदे यांचा थोड्या मतांनी पराभव झाला, अशी टीका अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)