Balaji Urban: बालाजी अर्बनची भव्यं वास्तु लवकरच सभासदांच्या सेवेत दाखल होणार – ॲड. मंगेश व्यवहारे

3 hours ago 2

बालाजी अर्बन ची 31 वी आमसभा संपन्न

देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Balaji Urban) : सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बालाजी अर्बन पतसंस्था प्रगतीची शिखरे गाठत असून संस्थेची स्वत:ची सुसज्जं व भव्यं वास्तु लवकरच सभासदांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे प्रतिपादन बालाजी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष ॲङ मंगेश व्यवहारे यांनी केले. बालाजी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ची 31 वी आमसभा स्थानिक मौनीबाबा संस्थानच्या भव्य प्रांगणात सोमवार दि 30 सष्टेंबर 2024 रोजी संपन्न झाली.

आमसभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेश व्यवहारे हे होते. तर मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा, कार्यकारी संचालक नारायणराव खरात , राज्यं पतसंस्था फेडरेशचे तज्ञ संचालक तथा संस्थेचे जेष्ठं संचालक सुदर्शन भालेराव, गोपाल शेटे, नारायण भवर, प्रताप खरात, आनंद जाधव, जुलाल सिंग परिहार,  पुष्पाताई राजपूत,  संध्याताई सावजी, तज्ञ संचालक ॲड. अर्पित मिनासे, सि.ए.मनीष गुरुदासानी, सरव्यवस्थापक अनिल गाडे , संस्थेचे तांत्रिक सल्लागार समिती सदस्यं शार्दुल व्यवहारे , धिरज लढ्ढा , स्वप्नील महाजन , सुदर्शन खरात यांची उपस्थिती होती.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पुढे बोलतांना ॲङ मंगेश व्यवहारे यांनी भागधारक व ठेवीदारांच्या विश्वासावरच संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असुन आपल्या सभासदांना अधिकाधिक सोयी सुवीधा पुरवण्याकडे कटाक्षाने लक्ष दिल्या जाईल याची उपस्थितांना ग्वाही दिली. तसेच संस्थेची स्वत:ची भव्य इमारत असावी ही सभासंदांची अनेक वर्षांपासूनची मागणी लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचेही ते म्हणाले. संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक पध्दतीने सुरु असल्याने आज रोजी संस्थेकडे 160 कोटी रुपयांच्या ठेवी असून 120 कोटींचे कर्जवाटप केले आहे. संस्थेचे खेळते भागभांडवल २०० कोटी रुपये असून एकत्रित व्यवसाय 280 कोटी रुपयांचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चालु आर्थिक वर्षांपासून सुरक्षित कर्ज वाटप करण्याचा संस्थेचा मानस असून त्याअनुषंगाने संस्थेने चिखली एम आय डीसी मध्ये दोन गोदामासह मेहकर व डोणगांव येथे संस्थेच्या सभासदांकरिता गोदाम सेवा सुरु केली आहे. त्यामुळे शेतकरी बंधुंनी संस्थेचे कौतुक केले आहे.

आमसभेच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून भगवान बालाजीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्तं , भाजपाचे जेष्ठं नेते अंकुशराव पाटील , भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड विजय कोठारी , अंबिका अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रे. सोसायटीचे संचालक प्रेमराज भाला , सुरेंद्रप्रसाद पांडे , भाजपा शहरध्यक्षं पंडीतराव देशमुख , महेश अर्बनचे अध्यक्ष आशिष लढ्ढा , चिखली अर्बन बँकेच्या संचालिका  सुनिता भालेराव , ठाणेदार संग्राम पाटील यांच्यासह यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आमसभेचे प्रास्तंविक राज्यं पतसंस्था फेडरेशचे तज्ञ संचालक तथा संस्थेचे जेष्ठं संचालक सुदर्शन भालेराव यांनी केले तर अहवाल वाचन सस्थेचे संचालक गोपाल शेटे, प्रताप खरात, जुलालसिंग परिहार सरव्यवस्थापक अनिल गाडे, वरिष्ठ अधिकारी रमेश देशमुख, सहाय्यक सरव्यवस्थापक अशोक नाईक, शाखाधिकारी सुनील शिंदे, राम जोशी , अतुल शास्त्री यांनी केले.

याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक तथा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले गोविंद दत्तात्रय महाजन यांनी आपले वडील स्वं. दत्तात्रय रामकृष्णं महाजन व आई स्वं. निर्मलाबाई दत्तात्रय महाजन यांच्या स्मृतिप्रित्यंर्थ बालाजी अर्बन तर्फे चालविण्यात येत असलेल्या बाळासाहेब देवसर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला 51,000/ रु ची देणगी दिल्याबद्दल त्यांचा पत्नी सौ. वेदा महाजन यांच्यासह सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी केले व आभार प्रदर्शन संचालक प्रताप खरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरव्यवस्थापक अनिल गाडे याचे मार्गदर्शनात सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले. आमसभेला सभासदांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. स्नेहभोजनाने आम सभेची सांगता झाली

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article