Bear Attack: अस्वलाच्या हल्ल्याने कोसमी येथील शेतकरी गंभीर जखमी

2 hours ago 1

कोरची (Bear Attack) : बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कोसमी येथे शेतकरी बैल जोडी घेऊन स्वताच्या शेतातील मिरचीची वाडी बघू बैल चारत असताना झुडपात दळीमारुन असलेल्या अस्वलाने हल्ला (Bear Attack) करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी 9.30वाजता घडली आहे. मसरु रामजी पोरेटी 60 असे जखमी शेतकऱ्यांचे नाव आहे.

बेडगाव वरून तीन किमी अंतरावर असलेल्या कोसमी येथील मशरू पोरेटी हे सकाळी उठून चहापाणी नाश्ता करून बैल जोडी घेऊन शेतावर जात असताना झुडपात दळून असलेल्या अस्वल्याने हल्ला (Bear Attack) केल्याने गंभीर जखमी झाले आहेत. वनपरिचित्र अधिकारी ठाकरे यांनी वनरक्षक व वनपाल यांना पाठवून मशरू पोरेटी यांना कोरची ग्रामीण रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केले.

पण प्रकृती गंभीर असल्याने गडचिरोली येथे सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी वन कर्मचाऱ्यांनी दाखल करण्यात आले आहे. बेडगांव वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे पुढील तपास करत असून नागरिकांनी जंगलात जात असताना दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. बेडगांव वनपरिक्षेत्रात अस्वलाच्या हल्ला दुसरी घटना आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article