उन्हाळ्यात शरीराची लाही लाही होते. अनेकांना उन्हाळा सहन होत नाही. मात्र ऋतू बदलातून जाताना आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल केल्यास शरिराचे त्रास कमी होण्यात मोठी मदत होते. उन्हाळ्यात आहारात थोडे बदल केल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
उन्हाळ्यात शरीराला कूलिंग इफेक्ट देण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही काही अतिशय सोप्या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकता. उन्हाळ्यात शरीरात पित्त वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. यामुळे तुमच्या शरीरातील तापमान वाढू शकते. त्यामुळे, तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात तुमचे शरीर थंड ठेवायचे असेल आणि अतिरिक्त उष्णतेपासून मुक्ती मिळवायची असेल, तर अशा पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवा, ज्यामुळे तुमच्या शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होईल.
मोसमातील फळे
निसर्गाने प्रत्येक फळाचा काळ ठरवून दिला आहे. नैसर्गिकरित्या त्या त्या काळात येणारी फळे जसे की कलिंगड, खरबूज, काँटालूप, नाशपाती, सफरचंद, बेरी, प्लम्स इत्यादी नियमितपणे खावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी तर वाढेलच, शिवाय तुम्हाला थंडावाही जाणवेल.
वेळवर अन्न ग्रहण
काही लोक तक्रार करतात की, ते निरोगी अन्न घेत असले तरीही त्यांना छातीत जळजळ किंवा खूप उष्णता जाणवते.
हे देखील कारण आहे की, आपण जेवणात खूप अंतर राखतो. वेळेवर अन्न न घेतल्याने शरीरातील उष्णतेची पातळीही वाढते. कारण त्यामुळे पित्तदोष बिघडू शकतो. त्यामुळे नेहमी वेळेवर अन्न खाण्याची सवय लावा.
त्वचेची घ्या खास काळजी
उन्हाळ्यात तुमच्या स्कीन केअर रूटीनमध्ये खस, चंदन आणि चमेलीचे तेल समाविष्ट केले तर ते शरीराला थंड होण्यास मदत करते. एवढेच नाही तर आंघोळीपूर्वी शरीराला खोबरेल तेलाने मसाज केल्याने तुम्हाला फायदे मिळतील.
बर्फ सेवन शक्यतो टाळा
सामान्यपणे लोक उन्हाळ्यात थंड वाटवं म्हणून बर्फाचे सेवन करतात. त्यामुळे त्यावेळी थंड वाटते, पण प्रत्यक्षात बर्फ हा शरीरासाठी उष्ण असल्यानं शरिरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. बर्फाचे सेवन केल्याने शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे बर्फ किंवा रेफ्रिजरेटरचे पाणी पिणे टाळा. त्याऐवजी मातीच्या माठातील पाण्याला प्राधान्य द्या. हे थंड देखील आहे आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करते. यामुळे तुमचे शरीर थंड राहण्यास मदत होते.